Pune To Akkalkot I पुणे ते अक्कलकोट I संपूर्ण प्रवास माहिती I

Описание к видео Pune To Akkalkot I पुणे ते अक्कलकोट I संपूर्ण प्रवास माहिती I

नमस्कार मंडळी..
पुणे ते अक्कलकोट ह्या प्रवासात आपले मनापासून स्वागत करतो..
मंडळी मागील बऱ्याच दिसंपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि आता कुठे त्याने थोडी विश्रांती घेतली आहे
म्हणूनच मी घरा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आवडत्या भटकंती साठी बाहेर पडायचे ठरवले,आणि त्या प्रमाणे मी आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट ला जाण्याचा निर्णय घेतला..
मंडळी अक्कलकोट मधे स्वामी समर्थांचे दर्शन तर घ्यायचे आहेच, पण त्याचबरोबर आपल्या अक्कलकोट ची काही अनोखी माहिती पण द्यायची आहे..
ही माहिती आपल्याला अक्कलकोट मधे खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामूळे ही माहिती आपल्याला मिळाल्या नंतर आपण ती माहिती आपल्याला मित्रमंडळी नातेवाईक आणि जवळच्या लोकांना शेअर करू शकता..
अशी ही कोणती माहिती आहे जी मी देणार आहे ???
आहो...
आपण सगळेच लोक अक्कलकोट ला जातो पण आपल्याला हे माहीत आहे का..?
अक्कलकोट मधे स्वतः स्वामी समर्थांनी १२४ वर्षांपूर्वी सुरू केलेले अन्न छत्र आज ही अखंड सेवा देत आहे..
आपण कधी ह्या अन्न छत्रात प्रसाद घेतले आहे का ?
आपल्याला माहिती आहे का अक्कलकोट मधे समर्थ रामासस्वामींनी प्रभु श्रीरामाचे मंदिर स्थापन केले आहे.?
आपल्या माहिती आहे का ह्या राम मंदिरात एक अनोखी मुर्ती आहे जी भारतात इतरत्र कुठेही आपल्या बघायला मिळणार नाही.?
आपल्याला माहीत आहे का जर आपण रत्री खूप उशीरा अक्कलकोट मधे गेलो आणि जर तिथे आपल्याला काही अडचण आली जसे राहण्याची व्यवस्था नाही झाली,किंवा आपल्यासोबत कुटुंबात जर लहान बाळ असेल आणि त्याला जर दूध द्यायला लागले आणि इतक्या उशीरा सर्व शहर जेव्हा बंद असते तेव्हा अशावेळी आपण कोणाला हक्काने मदत मागू शकतो ??

मंडळी अश्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मी आपल्याला ह्या पुणे अक्कलकोट तुळजापूर ह्या मालिकेतून देणार आहे
आणि त्यासाठी आपण ही संपूर्ण मालिका शेवट पर्यंत बघायची आहे ..
ह्या मालिकेच्या पहिल्या भागात आज मी आपल्याला पुणे ते अक्कलकोट ह्या प्रवसाची संपूर्ण माहिती देणार आहे, ज्या मधे मला किती रुपये टोल भरावा लागला, मी जेवायला कुठे थांबलो,माझा प्रवास कसा झाला, मी अक्कलकोट मधे कधी पोहोचलो..ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा

#पुणेतेअक्कलकोटप्रवासमाहिती
#प्रवासातकुठेथांबावे
#रस्तेकसेआहेत
#टोलकिती

Комментарии

Информация по комментариям в разработке