BJP आणि Ajit Pawar गटाला गळती लागलीये पण शिवसेनेचे नेते Eknath Shinde यांची साथ का सोडत नाहीयेत ?

Описание к видео BJP आणि Ajit Pawar गटाला गळती लागलीये पण शिवसेनेचे नेते Eknath Shinde यांची साथ का सोडत नाहीयेत ?

#BolBhidu #EknathShinde #MaharashtraVidhanSabhaElection

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीतील पक्षांना गळती लागल्याचं पहायला मिळतंय. भाजपमधील काही नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर काही नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर हर्षवर्धन पाटील, प्रंशात परिचारक हे नेतेही लवकरच शरद पवार गटात जातील, असं बोललं जातंय. दुसरीकडं अजित पवार गटातील वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे, भाग्यश्री अत्राम या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. तर विलास लांडे, रविंद्र नाना पाटील हे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पण एकीकडे महायुतीतल्या या दोन्ही पक्षांना गळती लागलेली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने शिंदेंची साथ सोडलेली नाही, तसंच शिंदेंच्या कोणत्याही नेत्याच्या पंक्षातराच्या चर्चाही होत नाहीत. त्यामुळं एकीकडं विधानसभेला कमबॅक करण्याची तयारी करताना भाजप आणि अजित पवार गटासमोर पक्षातली गळती रोखण्याचं आव्हान आहे. तर दुसरीकडं एकनाथ शिंदेंना मात्र नेते सोडून जातील याचा सध्यातरी धोका नसल्याचं दिसून येतं. आता शिंदेंच्या शिवसेनेतील नेते शिंदेंची साथ का सोडत नाहीयेत. त्यामागची नेमकी कारणं काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке