Ajit Pawar बारामतीत प्रचारासाठी एका दिवसांत ६० गावं फिरतायत, Sharad Pawar यांची फिल्डिंग जड जाणार ?

Описание к видео Ajit Pawar बारामतीत प्रचारासाठी एका दिवसांत ६० गावं फिरतायत, Sharad Pawar यांची फिल्डिंग जड जाणार ?

#BolBhidu #AjitPawarBaramati #SharadPawar

शेजारी उभा असलेली मारूतीची गाडी, त्याच्यावर लावलेला कर्णा, हातात माईक आणि समोर शे-पाचशे गावकरी. कोणत्याही बड्या नेत्याच्या इलेक्शनकाळात अशा सभा व्हायच्या पण त्या नव्वदीच्या दशकात. लोकं वाढली गावं वाढली मारूतीच्या मंदिरात नाहीतर गावच्या पिंपळाखाली होणाऱ्या या सभांची जागा जंगी सभांनी घेतली. मोकळ्या मैदानात बड्या नेत्यांच्या सभा होवू लागल्या. पण पुन्हा गावच्या पिंपळाखाली, वाडीच्या तिकाटण्यावर एका बड्या नेत्याच्या सभा होवू लागल्यात. या सभा आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या. यापूर्वीच्या बारामती विधानसभेच्या निवडणूका म्हणजे कण्हेरीच्या मारूती मंदिराजवळ होणारी पहिली सभा आणि बारामतीत शेवट होणारी अखेरच्या दिवसाची सांगता सभा.

मधल्या काळात अजित पवार राज्यभर फिरायचे, आपले उमेदवार निवडणूक आणण्यासाठी फिरायचे. आत्ता मात्र अजित पवार बारामतीच्या गावखेड्यात फिरू लागलेत. एका दिवसात 60-60 गावांमध्ये बैठका घेवू लागलेत. शे पाचशे लोकं असतील तरी भाषणं करू लागलेत. स्वत:ला मत मागण्यासाठी म्हणून गेल्या वीस तीस वर्षात ज्या गावांची पायरी चढण्याची वेळ अजित दादांवर कधीच आली नव्हती ती नवी वेळ अजित दादांवर आज का आली? पाहूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке