Naldurg । नळदुर्ग श्री खंडोबा यात्रा 2024 । येळकोट , येळकोट जयघोषाने मैलारपूर नगरी दुमदुमली ...

Описание к видео Naldurg । नळदुर्ग श्री खंडोबा यात्रा 2024 । येळकोट , येळकोट जयघोषाने मैलारपूर नगरी दुमदुमली ...

#khandoba_status #andur #naldurg

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असलेल्या श्री खंडोबाची पौषपौर्णिमा महायात्रा बुधवार आणि गुरुवारी पार पडली. या दोन दिवसांत किमान पाच लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन , भंडारा (हळद ) - खोबरे यांची मुक्तपणे उधळण केली, त्यामुळे सर्व भाविक सोन्याच्या रंगाने न्हाऊन निघाले होते.येळकोट, येळकोट जय मल्हार जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील नंदीध्वज (काठ्या ) येण्यास सुरुवात झाली. गुरुवार दुपारपर्यंत जवळपास सातशे नंदीध्वज ( काठी ) चे यात्रास्थळी आगमन झाले, किमान 50 ते 100 वारू आणि भाविक काठीला आकर्षक सजावट करून, हलगी, सनई, तुतारीच्या निनादात काठी नाचवत मंदिर प्रदक्षिणा करून, नेहमीच्या ठिकाणी मुक्काम केला,अनेक ठिकाणी वाघ्या आणि मुरळीच्या नृत्यावर खंडोबाची गाणी सुरू होती.

दोन दिवस दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती, किमान सहा तास दर्शनासाठी लागत होते, लातूर जिल्ह्यातील वरवंटी येथील खोबरे बंधूनी यात्रेत मोफत अन्नदान करून, किमान 50 स्वयंसेवकांनी मंदिरात दोन दिवस पोलिसांप्रमाणे सेवा बजावली . खोबरे बंधुमुळे पोलिसानवरील ताण मागील दोन वर्षांपासून कमी झाला आहे.

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्यांचे आगमन झाले, यावेळी आकाशात रंगीबेरंगी शोभेचे दारूकाम करण्यात आले, जय मल्हार या अक्षरने भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडले. अणदूर खंडोबा मंदिरातील दोन अश्व आणि मानाची काठी येताच, वातावरण भक्तिरसात चिंब झाले होते.

पहाटे तीनच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यानंतर छबिना मिरवणुकीस प्रारंभ झाला, मसोबा, जुने मंदिर अशी प्रदक्षिणा करून शुक्रवारी सकाळी छबिना मिरवणुकीची सांगता झाली.

यंदा धाराशिव जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बोरी धरणात पाणीसाठा झाला नाही, तरीहि भाविकांसाठी कॅनॉलला पाणी सोडण्यात आले, तसेच नळदुर्ग नगर परिषदच्या वतीने जवळपास 15 ते 20 टँकर दोन दिवस पाणीपुरवठा करीत होते, मंदिर समितीने पाच ठिकाणी बोअर घेऊन 24 तास पाणीपुरवठा केला , त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री खंडोबा मंदिर समिती, नळदुर्ग नगर परिषद, अणदूर आणि नळदुर्ग यात्रा कमिटी, दोन्ही गावाचे मानकरी आणि समाजसेवक यांनी परिश्रम घेतले. नळदुर्ग पोलिस स्टेशनच्या पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Комментарии

Информация по комментариям в разработке