पुढच्या पिढीला समजायला हवं की मोठं व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया काय आहे : योगिनी चौक Yogini Chouk

Описание к видео पुढच्या पिढीला समजायला हवं की मोठं व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया काय आहे : योगिनी चौक Yogini Chouk

दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी सन्मती बाल निकेतन मांजरी (बु ||) येथे कलर्स मराठीवर सुरू असणाऱ्या "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेचे कलाकार व दिग्दर्शक विद्यादानानिमित्त उपस्थित होते. हा विद्यादानाचा उपक्रम महाराष्ट्रात मुंबई, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या पाच शहरांमध्ये नुकताच राबविला. या उपक्रमाची गुरुवारी मांजरी बुद्रुक येथील 'सन्मती बाल निकेतन' येथे सांगता करताना 'सिंधूताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेतील कलाकार अनन्या टेकवडे, किरण माने, प्रिया बेर्डे, आनंद प्रभू, युवराज राजे, दिग्दर्शक विठ्ठल टाकवे, निर्माते मंगेश जगताप हे उपस्थित होते. माईंच्या समाजकार्याचा वसा यशस्वीपणे पुढे चालविणाऱ्या व्यक्तींचा कलर्स मराठी वाहिनी तर्फे या वेळी मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यात सन्मती बाल निकेतनच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ, ममता बालसदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, अरुण सपकाळ, मन:शांति छात्रालयाचे अध्यक्ष विनय सपकाळ, मनीष बोपटे, स्मिता पानसरे, सरोज जांगरा, डॉ. माधवी साळुंखे, मनीषा नाईक, यश सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान मालिकेविषयी बोलताना अभिनेत्री योगिनी चौक म्हणतात, 'पुढच्या पिढीला समजायला हवं की इतकं मोठं व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया काय आहे.' ममता ताईंनी कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांचा सत्कार केला आणि सगळ्यांचे आभार व्यक्त केले.

संघर्षाचं बाळकडू होतं जिच्या ठायी, अशी चिंधी बनली लाखो अनाथांची आई…
पाहा नवी चरित्रकथा "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची", 15 ऑगस्टपासून संध्या. 7.00 वा. फक्त कलर्स मराठीवर.

#ColorsMarathi #SindhutaiMaaziMaai #सिंधुताईमाझीमाई
@ @colorsmarathi @mamatasindhutaisapkal


#SindhutaiMaziMai #MajhiMaai #AnathLekranchiAai #ColorsMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке