Maharashtra Desh Ha (Maharashtra Gaan) | Official Song |

Описание к видео Maharashtra Desh Ha (Maharashtra Gaan) | Official Song |

#sanyuktamaharashtra #संयुक्तमहाराष्ट्राची६१वर्ष #maharashtragauravgeet #maharashtraabhimangeet #61yearsofsanyuktamaharashtra #prideofmaharashtra #maharashtrasphoortigeet #gauravMaharashtracha

महाराष्ट्र - असे एक राज्य की ज्याच्या नावामध्ये राष्ट्राचा उल्लेख होतो ! म्हणूनच कदाचित शंभर वर्षांपूर्वी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी जेव्हा या महान प्रांताकडे पाहिले ,तेव्हा त्यांना या वैविध्यपूर्ण व सर्वव्यापी राष्ट्राचे वर्णन आपल्या शब्दसंपन्न काव्यामृतात करावेसे वाटले असावे. परंतु त्यांचा तो दृष्टिकोन आज त्यांच्याच नजरेतून आपल्याला बघता येईल का ? तीच दृष्टी न्याहाळण्याचा आम्ही केलेला हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र गान!

तसं सांगायचं झालं तर आमच्या या प्रांतामध्ये फारच विलक्षण गोष्टी आढळतात; उदाहरणार्थ एका टोकाला इतका पाऊस की पूरच यावा याउलट दुसऱ्या टोकाला बघावं तर पावसाचा एक थेंब नाही. एवढेच काय इथल्या प्रत्येक ठिकाणची माती सुद्धा निराळी, पण तरीसुद्धा प्रत्येक जण हक्काने म्हणावा की
" आमची ही महाराष्ट्राची माती , लाखमोलाची मराठी माती !"
ही मराठी नाळ इतकी खोलवर रुजलेली की राज्या बाहेरच काय, तर संपूर्ण जगभरात देखील कुठे मराठी शब्द कानावर पडला तर कुतूहलाने डोळे लुकलुकणार आणि तो चेहरा शोधला जाणार !

महाराष्ट्राच्या ६१ वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त या काव्याकडे एका वेगळ्याच साजात आपल्यासमोर घेऊन येताना आमचा देखील मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, यात शंकाच नाही. माधुर्य, लाघवी, बेधडक, स्पष्ट हे आणि इतकेच काय, तर अजून कितीतरी मराठी भाषेतलेच शब्द आपल्या या मराठी विषयी बोलायला कमी पडतील. ती गोडी आपणच आपल्याला अवगत असलेल्या कलेतून लोकांच्या मनामनात आणि घराघरात जास्त सुवर्णसंपन्न रित्या पोचवू शकतो, नव्हे घडवू शकतो आणि म्हणूनच काय तो संगीतक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गायक - वादक मित्रमंडळींना एकत्र करून आम्ही घातलेला हा घाट !

मराठी काव्याचे प्रकार सांगायचे झाले तर भारुड, ओवी, अभंग, विराणी आणिक कितीतरी ! पण सर्व माणसांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये एक उर्जा संचारण म्हणजे स्फूर्ती गीत ! आणि हीच कदाचित या काव्याच्या जन्माची कहाणी असावी !

हा महाराष्ट्र घडवण्यासाठी कित्येकांनी या भूमीला आपले रक्तपुष्प वाहिले आणि आज त्या रक्तपुष्पाची किंमत आपण कुठेतरी विसरलो आहोत. आम्ही केलेला हा प्रयत्न म्हणजे जणू त्या रक्त पुष्पाला दिलेली एक मानवंदना !

महाराष्ट्र देश हा ( महाराष्ट्र गान )

Audio Credits :
संकल्पना - संगीत - संगीत संयोजन
स्नेहल - स्वप्निल - केतन
कवी - स्व.श्री.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
सहायक काव्य - ओम भुतकर
अभिवाचन - महेश वामन मांजरेकर

गायक
सचिन पिळगांवकर, राहुल देशपांडे, नंदेश उमप, आशिष कुलकर्णी
वैशाली भैसने - माडे, विभावरी आपटे- जोशी, उर्मिला धनगर, मुग्धा वैशंपायन

सतार - कल्याणी देशपांडे
सरोद - नितीश पुरोहित
शहनाई - अनिकेत साळुंखे
बेस गिटार - वेदा टोके

तालवाद्य - डॉ. राजेंद्र दूरकर, पद्माकर गुजर
ताशा - मंदार बगाडे, कपिल जगताप
ढोल - केतन पवार, योगेश सप्रे, स्नेहल भावे, स्वप्निल भावे
चौघडा - केतन पवार
सह गायन - जयदीप वैद्य
कोरस -
स्नेहल भावे, श्रद्धा आठवले, साक्षी देशपांडे, अदिती रंगराजन, प्राजक्ता माने, वेदश्री घोटकर
स्वप्निल भावे, केतन पवार, वज्रांग आफळे, शुभम मुळे, योगेश सप्रे, निनाद जोगळेकर

प्रोग्रॅमिंग - स्वप्निल भावे ( ट्युनिंगहार्ट स्टुडिओज्, पुणे)

ध्वनिमुद्रण - डॉन स्टुडिओ, पुणे
आजिवासन साऊंड्स, मुंबई
रिअल टच स्टुडिओ, मुंबई

ध्वनिमुद्रक - ईशान देवस्थळी(डॉन स्टुडिओ,पुणे)
अवधूत वाडकर ( आजिवासन साऊंड्स,मुंबई )

ध्वनिमिश्रण - तुषार पंडित ( डॉन स्टुडिओ, पुणे )

Video credits :

दिग्दर्शन - तन्मय धनंजय जक्का

छायाचित्रण व स्थिरचित्र - सौरभ ससाणे , कौस्तुभ चव्हाण

संकलन - हर्षवर्धन जाधव ( स्टुडिओ कोरियंडर )

व्हिज्युअल & पब्लिसिटी डिजाइन - ओंकार मरकळे

कॅमेरा सामग्री - अकॉर्ड इक्विप्स, पुणे
अकॉर्ड इक्विप्स, मुंबई

लोकेशन - वुल्फ क्रो स्टुडिओज् , मुंबई
क्युबिक स्टुडिओ, पुणे

स्टायलिंग पार्टनर - ईश्वरी खोत (label.ika)
सुनेत्रा हरकरे - माने (apparelly)
वेशभूषा पार्टनर - गलानी फॅशनस्
ज्वेलरी पार्टनर - खजिना ज्वेलरी
केशभूषा व रंगभूषा - अबोली चांडक (youbyaboli)

निर्मिती सूत्रधार - स्नेहल भावे

व्यवस्थापन - स्नेहल भावे, स्वप्निल भावे, केतन पवार, योगेश सप्रे, साक्षी देशपांडे, ईशा काळे

स्टुडिओ पार्टनर - डॉन स्टुडिओ

निर्मिती - टयुनिंग हार्ट

You can contact us at : [email protected]
7507898830/9422942588

Social media handles :
Instagram - https://instagram.com/_tuningheart?ig...
Facebook -   / _tuningheart.  .

Комментарии

Информация по комментариям в разработке