Ptosis Surgery Nashik | Dr Kiran Nerkar | Plastic & Cosmetic Surgeon | Aakar Aesthetics | Review

Описание к видео Ptosis Surgery Nashik | Dr Kiran Nerkar | Plastic & Cosmetic Surgeon | Aakar Aesthetics | Review

प्लास्टिक सर्जरीने मिळाली नवीन दृष्टी

आपल्या डोळ्यांच्या पापण्या वर झाल्यानंतरच आपल्याला एखादी गोष्ट दिसण्यास मदत होते. परंतु काही मुलांमध्ये जन्मतः पापण्यांना वर करणारे स्नायू कमकुवत किंवा अशक्त असतात, त्यामुळे अश्या मुलांमध्ये पापण्या पाहिजे तेवढ्या वर होत नाहीत. अश्या परिस्थितीला Bilateral Congenital Ptosis ( Bilateral : दोघे बाजुंना , Congenital : जन्मतः ). अशी मुले अथवा मुली यांच्यामध्ये ह्या समस्येमुळे वेळीच उपचाराअभावी आंधळेपणा ( Amblyopia ) येऊ शकतो.

साधारणतः जगभरात ८५० पैकी एका मुलामध्ये हि समस्या आढळून येते. जर एकाच बाजूला समस्या असेल तर डाव्या बाजूला ति असण्याची शक्यता दाट असते. मुले अथवा दोघांमध्ये हि समस्या सारख्याच प्रमाणात आढळून येते.

अश्या मुलांना समोरचे बघण्यासाठी हनुवटी आणि मान पाठीमागे करून बघावे लागते. त्यामुळे सभोवतालची इतर मुले त्यांच्यावर हसतात , त्यांची गम्मत उडवतात , हे बाकीच्यांना दिसू नये म्हणून काही मुलं गॉगल्स वापरतात , तसे केल्यास मुले त्यांना " आंधळा " म्हणून चिडवतात. ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग ति बाहेर इतर मुलांमध्ये जाणे टाळतात. अश्याने मुलांच्या शिक्षणावरही खूप दुष्परिणाम होतो.

ह्यावर प्लास्टिक सर्जरीद्वारे आपल्याला मात करता येऊ शकते. सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीमध्ये कपाळाला आठ्या आणणाऱ्या स्नायूंबरोबर विशिष्ठ पद्धतीने पापण्यांच्या कडांना जोडून पापण्यांची वर होण्याची कार्यक्षमता परत आणली जाते. ह्या ऑपरेशनला फ्रॉनटालीस स्लिंग सर्जरी असे म्हटले जाते. मांडीच्या स्नायूंवरील आवरणाचा ( Fascia lata ) काही भाग घेऊन तो पापण्यांच्या कडांच्या वरती विशिष्ठ पद्धतीने ओवला जातो आणि मग तो कपाळाच्या स्नायूंमध्ये ओवला जातो. अश्या पद्धतीने कपाळाच्या स्नायूंची ताकद आपल्याला पापण्यांची उघडझाप करण्यासाठी वापरता येते.

Комментарии

Информация по комментариям в разработке