Bhairavgad Shirpunje |भैरवगड शिरपुंजे |ghanchakkar 4th Highest Peak of MH |घनचक्कर शिखर |Vlog No - 3

Описание к видео Bhairavgad Shirpunje |भैरवगड शिरपुंजे |ghanchakkar 4th Highest Peak of MH |घनचक्कर शिखर |Vlog No - 3

Bhairavgad Shirpunje | ghanchakkar 4th Highest Peak of Maharashtra | भैरवगड शिरपुंजे | घनचक्कर शिखर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांमध्ये क्रमांक तीनचे शिखर आहे.

महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहुन दोन मार्गाने शिरपुंजे या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई नगर महामार्गावर कल्याण, मुरबाड, माळशेज घाट मार्गे १५९ किमी वरील ओतुर गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा मार्गे ३० किमी वरील कोतुळ गावात जातो. कोतुळहुन कोतुळ राजुर रस्त्यावर विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (कोळथेच्या भैरवगडाच्या पायथ्याचे गाव अंतर २५ किमी) गाठावे. कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो.हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.
२) मुंबई नाशिक महामार्गावर घोटी पर्यंत जावे. घोटीहुन भंडारदरा मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४ किमीवर माणिक ओझर हे गाव आहे.माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.
३) कोथळेचा भैरवगड किल्ला पाहून किंवा पाचनई वरुन भैरवगड शिरपुंजेला जाणार असल्यास कोतुळ - राजुरला रस्त्यावर कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे . (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते. राजुरहुन आंबितला जाण्यासाठी एसटी बस आणि जीपची सोय आहे. त्याने शिरपुंजेच्या फ़ाट्यावर उतरुन चालत गडपायथा गाठण्यास पाउण तास लागतो.
राहाण्याची सोय : २७ किमी वरील पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे.
जेवणाची सोय : आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय : गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : शिरपुंजे गावातून १ तासात गडावर जाता येते.

Connect with me
INSTAGRAM - https://www.instagram.com/rushi.mundh...



#youtubeblogger #rushimundhe #YoutubeShorts #Viral #youtube #trending #shorts#travel #travelvlog #bhairavgad #sherpunje #higest #peak #maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке