श्री क्षेत्र गाणगापूर ( कर्नाटक ) या दत्त मंदिराला आयुष्यत एकदा नक्कीच भेट द्या

Описание к видео श्री क्षेत्र गाणगापूर ( कर्नाटक ) या दत्त मंदिराला आयुष्यत एकदा नक्कीच भेट द्या

गाणगापूर ते अकलकोट व तसेच सोलापूर सिद्देश्वर असा आमचा काल चा प्रवास होता, बुधवारी रात्री आम्ही काही मित्र या प्रवासाला निघालो, प्रवास खूप छान झाला यातूनच या गोष्टी सुद्धा समजल्या कि त्या भागातील राहणीमान थोड वेगळे आहे, काही चांगली वाईट लोक आम्हाला मिळाले वाईट तर त्यांना बोलता येणार नाही कारण प्रत्येक जण आपल्या साठी कुठे तरी संघर्ष करत होता, प्रवास खूपच छान होता आम्ही सकाळी 7.20 ला गाणगापूर पोचलो तितुनच आमचे मित्र प्रवीण व विनय यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मंदिरा पर्यंत नेले, तिते गेल्यावर आम्ही पहिला संगम नदी पत्रात जाऊन स्नान केली पाणी थंडगार होते, स्नान केल्यावर दत्त मंदिरात जाऊन दत्त दिगंबराचे दर्शन घेतले दत्त गुरु चे नाव घेत आम्ही एक परिक्रमा केली, तिते अनेक लोक व साधू पोथी वाचत होते ते वाचण्यासाठी किमान सात दिवस तरी लागतात असे मी माझ्या सावगड्या कडून ऐकले मनात इच्छा झाली कि आपण ही यावे हिते पोथी पटण करण्यास पण खुच काही गोष्टी कामामुळे जमत नाहीत,
तिथे गेल्यावर दत्तगुरु च्या असीम शक्तीची जाण होते आणि मी तर समजायला लागल्या पासून दत्तगुरुदेव यांनाच बघत आलो आहे, तेच आमचे गुरु तेच आमचे सोबती आणि तोच आमचा पाटीराखा, दत्तगुरुच्या आजच्या दर्शनाने शरीरात एक वेगळेच बळ आले. मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या दर्शनासाठी
ST बस ने तीन तास प्रवास करून आम्ही पोचलो अकलकोटला
तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले व समर्थाच्या मठा मध्ये गेलो तिथे स्वामी च्या समाधीचे दर्शन घेतले स्वामी ज्या छोट्याश्या खोलीत वास्तव करत होतो ती पाहिली, समाधी समोर जेव्हा आम्ही बसलो दर्शना नंतर तेव्हा त्या शांत वातावरणात मला असे भासले कि स्वामींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि ते बोलत आहेत कि घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याचा पुरावा ही मला मिळाला

Комментарии

Информация по комментариям в разработке