वेडात मराठे वीर दौडले सात | vedat marathe veer doudle sat

Описание к видео वेडात मराठे वीर दौडले सात | vedat marathe veer doudle sat

फाल्गुन कृ. ३ महाराष्ट्राचे #आराध्यदैवत #छत्रपती_शिवाजी_महाराजांची जयंती. #गोब्राह्मण, #प्रतिपालक, #सिहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना #राष्ट्रकुट परिवारातर्फे मानाचा मुजरा.

गडहिंग्लज येथून नेसरी हे साधारणपणे २० कि.मी. अंतर असून येथे जाताना आपण अतिशय निसर्गरम्य वाटेने प्रवास करतो. नेसरी येथे जाण्याचा महत्वाचा उद्देश हा स्वराज्याचे प्रथम सरसेनापती म्हणजेच #"सरनौबत" प्रतापराव गुर्जर व त्यांच्या बरोबरीने बहलोलखानाच्या १५००० फौजेवर हल्ला करणाऱ्या सहा शिलेदारांना सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट देऊन वंदन करणे.

महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सला काय निमित्य केला? असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली.’या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले. महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले. हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे.

महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले.

पंधरा हजार सैन्यावर हल्ला करण्यासाठी ज्यात होते. विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोटजी, आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच "सरनौबत" प्रतापराव गुर्जर त्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातही शिलेदारांना या नेसरीच्या लढाईत विरमरण आले.

या वीरांना राष्ट्रकुट परिवारातर्फे विनम्र आदरांजली.

"राष्ट्रकुट" चांगले वाचन... चांगली प्रेरणा ...
"Rashtrakut" चांगली दृष्टी... चांगला दृष्टीकोन...

Комментарии

Информация по комментариям в разработке