म्हणून शिवाजी महाराजांनी देवगिरी Reject केला? । Devgiri Fort | Devgiri killa | Part 2

Описание к видео म्हणून शिवाजी महाराजांनी देवगिरी Reject केला? । Devgiri Fort | Devgiri killa | Part 2

देवगिरी व्लॉग पुन्हा अपलोड करत आहोत. आपण आधी अपलोड केलेल्या व्हिडिओच्या इंट्रोमध्ये काही सेकंदाचे ड्रोन शॉट्स वापरण्यात आले होते. मात्र अनावधनाने (दुर्दैवाने) आपल्या एडिटरकडून या ड्रोन शॉट्सच्या मूळ मालकांना क्रेडिट्स देणे राहून गेले. या प्रकारास एक वर्ष झाले. मात्र ड्रोन शॉट्सच्या मूळ मालकांच्या पाहण्यात हा व्हिडीओ आल्यानंतर त्यांनी रीतसर त्यावर कॉपीराईट स्ट्राईक टाकला. यामुळे युट्युबने व्हिडीओ डाऊन अर्थात डिलीट केला. कॉपीराईट स्ट्राईक मारणं हा त्यांचा कायदेशीर हक्कच आहे. कारण आपल्या एडिटर सहकाऱ्याकडून ही चूक घडली होती. आणि ती निश्चितच माफीस पात्र नव्हती. आता आपला हा एडिटर (होतकरू सहकारी) दुसऱ्या कंपनीत कामाला लागला आहे. त्यामुळे त्यास आम्ही याबद्दल जाब न विचारता या चुकीची नैतिक जबाबदारी उचलत संबंधित ड्रोन शॉट्सच्या मूळ मालकांना मेलच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. व्हिडीओ डिलीट होण्यासारखी मोठी शिक्षा आम्ही भोगत आहोतच..

आपण पुन्हा या व्हिडीओस उदंड प्रतिसाद द्याल असा विश्वास आहे.

महाराजांनी देवगिरीचा राजधानी म्हणून का विचार केला नाही👇🏻

देवगिरी किल्ला अभेद्याहून अभेद्य असाच आहे.. फितुरी होऊनही तो सहजासहजी पडणारा नव्हता. मग असं काय कारण होतं की ज्यामुळे संपूर्म यादव साम्राज्याचा पाडाव झाला आणि जे कारण शिवाजी महाराजांना दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडावर वाघ दरवाजा बांधण्यासाठी पुरेसे ठरले.. ते कारण म्हणजे दुर्गम दुर्ग देवगिरीला परतीची दुसरी वाटच नव्हती. सोप्या भाषेत बालेकिल्ल्यावर जाणारी, येणारी वाट एकच होती. म्हणजे एखादा राजा बालेकिल्ल्यावर अडकला तर त्याची नाकेबंदी करणं सहज शक्य होतं कारण तो कुठल्या वाटेने बाहेर पडणार हे शत्रूला ठाऊक होतं.. कदाचित गडाची दुर्गमता पाहून तशी गरज कधी यादव राजांना भासली नसावी. मात्र खिलजीनं घात केलाच..

#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке