मोहोळच्या धीरज शेगरचे झी मराठीच्या सारेगमपा मध्ये सादरीकरण

Описание к видео मोहोळच्या धीरज शेगरचे झी मराठीच्या सारेगमपा मध्ये सादरीकरण

मोहोळ प्रतिनिधी दि.२६जून २०२१

 'झी मराठी चॅनेल' वरील "सारेगमपा" लिटिल चॅम्पसच्या कार्यक्रमात घुमला मोहोळचा आवाज ! गुरुवार दिनांक २४ जून पासून या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून शुक्रवार दि २५ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नाथ पंथी डवरी या समाजातील अवघे १३ वर्ष वय असणाऱ्या धीरज मच्छिंद्र शेगर या बाल कलाकारांनी आपली प्रतिभा सादर केली.
         पूर्वी पासून आजोबा शामराव शेगर हे बहुरूपांची सादरीकरण करत असत तर वडील मच्छिन्द्र शेगर यांचे कॉम्प्युटरचे दुकान असल्याने धीरजला ऑनलाईन गाणे ऐकण्याची आवड निर्माण झाली. मुलाची गायनाची आवड पाहून वडिलांनी गायनाचे धडे देण्याचे ठरवले दरम्यान अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्याकडे पुणे येथे रियाज सुरू केला. गायना सोबत हार्मोनियम देखील धीरज अप्रतिम वाजवतो.  
यापूर्वी 'कलर्स मराठी' या चैनल वरील "सुर नवा, ध्यास नवा" या स्पर्धेत त्याने मेगा ऑडिशन पर्यंत मजल मारली होती. झी मराठीवर आता सुरू असलेल्या पर्वात गुरुवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. आज झालेले सादरीकरणात "तुझ्या रूपाचं चांदणं पडलय अन मला भिजू द्या."  हे गीत सादर केले.

Комментарии

Информация по комментариям в разработке