निंबोळा येथील रविकिरण महाराज दोंडाईचाकर !तुफान कॉमेडी किर्तन

Описание к видео निंबोळा येथील रविकिरण महाराज दोंडाईचाकर !तुफान कॉमेडी किर्तन

नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .

धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

Комментарии

Информация по комментариям в разработке