सी विड नेमके काय आहे | मराठी | what is seaweed extract ?

Описание к видео सी विड नेमके काय आहे | मराठी | what is seaweed extract ?

​‪@shetkarimajha‬
*व्हीडीओ चा विषय : सी विड नेमके काय आहे | मराठी | what is seaweed extract ?

समुद्री शेवाळ म्हणून ओळखली जाणारी एक वनस्पती चा वापर समुद्र किनारा लाभलेल्या देशामध्ये खत म्हणून ह्याचा वापर सुरु झाला. फ्रान्स. ऑसट्रेलिया, नेदरलड,स्कॉटलंड,ब्रिटन ह्या सारख्या देशामध्ये ह्याचा वापर होत होता. सुरूवातीच्या काळा मध्ये वाळू मध्ये हे कुजवून त्याचा वापर केला जात होता पण नतर हे ओल्या स्वरुपात दूरवर नेऊन वापरणे सोईस्कर होत नव्हते. त्यामुळे हे कोरडे करून दूरवर ह्याचा वापर सूर्य झाला.
अस्कोफायलम, एक्लोनिया, फ्युक्स ह्या सारख्या शेवलाच्या जाती आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या पासून कोरडे शेवला मोठ्या प्रमाणात बनवून वापरले जात आहे.
बाजारत केल्प म्हणून विकले जाणारे शेवाळ हे मोठे वाढलेले शेवाळ आहे.
सिविड मध्ये सर्व सधारण पणे अल्जेनिक असिड आढळून येते. हे अल्जेनिक असिड जमिनीचा पोट सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काम करते. जमिनीत असलेल्या मेटालिक रॉजीक्लस बरोबर अल्ज्निक असिड एकत्र होऊन जास्त प्रमाणत पाणी धरून ठेवणारे क्षार तयार करते त्यामुळे जमिनीस एक लवचिक असा विशिष्ट घटक प्राप्त होतो. ज्यामुळे धूप कमी होते. व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
सीविड मध्ये व्हीटामीन्स आणि ऑक्सिन्स देखील आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने व् व्हीटामीन सी ( अस्कॉब्रिक असिड व्हीटामीन ई, व्हीटामीन बी१, बी १२ हे आढळून येतात. तसेच फ़ोलिक असिड, फोलोनिक असिड देखील असतात सी विद मधील ऑक्सिन्स इंडोल असेटिक असिड आढळून येते त्यामुळे सी विड पानावर फवारले असता पिकाची वाढ जोमात झाल्याचे दिसून येते सी विड मध्ये दोन प्रकारचे जिब्रालिनस आढळून येतात ज्याला शास्रनयांनी ए ७ ए३ असे नावे दिली आहे काहीच्या मते व्हीटामीन ए १ व व्हीटामीन ए ४ आहेत पण ह्यामुळेच पिकाची वाढ चांगली होते.
सी विड मधील पिकच्या वाढीसाठी असलेले सर्वच अन्नद्रव्य झाड पटकन शोषुन घेता येतील अशा स्वरुपात असतात असते त्यामुळे हे फवारल्या नतर झाडावर त्वरित परिणाम दिसतो
बाजारात मिळणारे सी विड हे प्रामुख्याने अल्कलाइन एक्सट्राक्शण पद्धतीने तपकिरी सी विड पासून बनविले जाते जो भाग विरघळत नाही तो वेगळा करून उरलेला भाग हा सी विड एक्सट्राक म्म्ह्णून विक्रीस आणला जातो. तसेच काही प द्द्तीमध्ये हे मोठ्या प्रेस मध्ये दाबून मिळवले जातात

माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .

शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक :   / shrihari.ghumare  
इनस्टाग्राम :   / shrihari_ghumare  
टिव्टर :   / setkarimaja  

#द्राक्ष_शेती #द्राक्षशेती #grape #grapefruitjuice #grapes #grapeframing #grape

Комментарии

Информация по комментариям в разработке