Mahamangal Sutta | Pali Marathi | #धम्म #बुद्ध #गाथा @dhammavidnyan
महामङ्गल सुत्त
एवं मे सुतं |एकं समयं भगवा सवात्थियं विहरित जेतवने अनाथ पिण्डिकस्स आरामे |
अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिकन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा |
येन भगवा तेनुपङकमि, उपसङकत्मित्तवा भगवंन्त अभिवादेत्वा एकमन्तं आठ्ठासि |
एकमन्तं ठ्ठिता खोसा देवता भगवन्त गाथाय अज्झाभासि:-
असे मी ऐकले आहे की, एके वेळी भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवंताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली बाजूला उभी राहून ती सत्पुरुष भगवंताला म्हणाली,
बहू देवा मनुस्सा च, मग्ङलानि अचिन्तयुं |
आकङखमाना सोत्थानं,ब्रुंहि मग्डलमुत्तमं ||१||
स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला , तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगावे||१||
असवेनाच बालनं, पण्डितानञ्च सेवना|
पूजा चं पूजानियानं,एतं मग्ङलमुत्तमं ||२||
मूर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगत करणे व पूज्य लोकांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय ||२||
पति रुप देसवासे च,पुब्बे च कतपुञ्ञता |
अत्सम्पापणिधि च,एतं मग्ङलमुत्तमं ||३||
अनुकूल स्थळी वास करणे, शुभ गोष्टी संपादन करणे व आपल्याला सन्मार्गावर लावणे हे उत्तम मंगल होय ||३||
बाहुसच्च ञ सिपच्च विनञयो च सुसिक्खितो |
सुभासितो च या वाचा,एतं मग्ङलमुत्तमं ||४||
अंगी बहुश्रुतपणा असणे, कला संपादन करणे, अंगी शिष्ठता बाळगणे व सुभाषण करणे हे उत्तम मंगल होय ||४||
माता पितु उपठ्ठानं,पुत्तदारस्स सग्ङहो |
अनाकुला च कम्मन्ता,कम्मन्ता, एतं मग्ङलमुत्तमं ||५||
आई वडिलांची सेवा करणे, मुलबाळ, बायको यांचे सांभाळ करणे व उलाढाली न करणे हे उत्तम मंगल होय ||५||
दानं च धम्मचरया च,ञातकानं च सग्ङहो |
अनवज्जनि कम्मानि, एतं मग्ङलमुत्तमं ||६||
दान देणे, धम्मचरण, आप्तेष्टांचा आदरसत्कार करणे, पापकर्मा पासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होय ||६||
आरती विरती पापा,मज्जपाना च संयमो |
अप्पमादो च धम्मेसु, एतं मग्ङलमुत्तमं ||७||
काया, वाचा व मनाने अशुभ न करणे, मद्यपान न करणे आणि धम्म कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल होय ||७||
गारवो च निवातो च सन्तठ्ठी च कञ्ञुता |
कालेन धम्मवणं एतं मग्ङलमुत्तमं||८||
गौरव करणे, नम्रता करणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय ||८||
खन्ति च सोवचसाकच्छा,समणानं च दस्सनं|
कालेन धम्मसाकच्छा,एतं मंग्ङलमुत्तमं||९||
क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, सज्जनांचे दर्शन घेणे आणि योग्य वेळी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल होय ||९||
तपो च ब्रम्हचरिच्च, अरियसच्चान दस्सनं |
निब्बानसाच्छिकिरिया च, एतं मग्ङलमुत्तमं ||१०||
तप, ब्रम्हचर्याचे पालन , आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय ||१०||
फुठ्ठस्स लोकधम्मोहि, चित्तं यस्स न कम्पति |
असोकं विरजं खेमं, एतं मग्ङलमुत्तमं ||११||
ज्यांचे मन लोक धम्माने विचलित होत नाही जो निःशोक, निर्मल आणि निर्भय राहतो हे उत्तम मंगल होय ||११||
एतादिसानि कत्वान, सब्बत्थं अमपराजिता |
सब्बत्थ, सोत्थि गच्छन्ति, एतं मग्ङलमुत्तमं ति ||१२||
येणेप्रमाणे कार्य करुन सर्वत्र अपराजित राहून लोककल्याणाला प्राप्त करितात हे त्यांच्या करिता(श्रेष्ठ पुरुष व मनुष्याकरिता) उत्तम मंगल होय ||१२|
Информация по комментариям в разработке