121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता | मुंबई | DCM Devendra Fadnavis

Описание к видео 121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता | मुंबई | DCM Devendra Fadnavis

121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(विधान परिषद, मुंबई | दि. 3 जुलै 2024)

00:00 - 121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता
राज्यसरकारचे सिंचनासंदर्भात मोठ्या प्रमाणात काम. मविआ सरकारमध्ये याला त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रोक. आतापर्यंत 121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता. या नदीजोड प्रकल्पांअंतर्गत मोठ्या प्रमाणात तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी पोहचणार.

01:04 - वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत
गोसेखुर्द धरणातील 100 टीएमसी पाणी कोणाच्याही वापरात नाही. यातील 62 टीएमसी पाणी वैनगंगा नदीतून, नळगंगा नदीत या प्रकल्पाच्या माध्यमातून पोहचणार. यामुळे विदर्भातील सुमारे 3,71,000 हेक्टर एवढी जमीन ओलीता खाली. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश.

02:13 - विदर्भाचे चित्र बदलणार...
या प्रकल्पा अंतर्गत 31 नवीन धरणे, अस्तित्वातील 6 धरणांची उंची वाढ तसेच जवळपास 426 किलोमीटरच्या जोडकालवा इ. बाबींचा समावेश. प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹88 हजार 575 कोटी, गुणोउत्तर 1.55, आर्थिक परतावा 9.26%. मोठ्या प्रमाणात विदर्भाचे चित्र बदलणारा नदी जोड प्रकल्प.

03:35 - दमणगंगा-एकदरे-गोदावरी प्रकल्पाबाबत
1.16 टीएमसी क्षमतेचे एकदरे धरणाजवळ हा प्रकल्प बांधण्याचे प्रस्थावित. यातून 3.55 टीएमसी पाणी प्राप्त होणार. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी ही वैतरणा उपखोऱ्यातील चार धरण बांधून 5.68 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात मिळणार. उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात, वैतरणा खोऱ्यातील 34 टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचे प्रस्तावित. वैतरणा-गोदावरी खोर्‍यातील उल्हास खोऱ्याचे 19.90 टीएमसी पाणी पुन्हा गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या संदर्भात प्राथमिक अहवाल तयार.

04:46 - तापी खोऱ्यातील पाणी चकनापूर धरणात आणण्याची योजना सुरु.
कोकणातून तापी खोऱ्यात जाणारे पाणी, त्यातील नार-पार-गिरणा हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प. यातील पश्चिमी वाहिनी नार ,पार आणि औरंगा या नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाणी वापर प्रस्थावित. या प्रकल्पामुळे मालेगाव तालुक्यातील 25 हजार हेक्टर, जळगाव जिल्यातील 17 हजार हेक्टर, स्थानिक वापरातील 7 हजार हेक्टर, असे जवळपास 49 हजार हेक्टर जमिनीला फायदा. या प्रकल्पात 9 धरणे प्रस्थावित आणि यातील पाणी चकनापूर धरणात आणण्याची योजना. ₹7015 कोटी या प्रकल्पाची किंमत आणि 11% आर्थिक परतावा. SLTC ची मान्यता.

06:05 - सगळी काम अंतिम टेंडर पर्यंत आणण्याचा प्रयत्न .
तूटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणार पाणी, जवळपास ₹1,50,000 कोटी खर्च करून परत आणण्याचा सरकारचा निर्णय. सर्व काम अंतिम टेंडर पर्यंत नेण्याचा प्रयत्न.

#Mumbai #MonsoonSession2024 #VidhanBhavan #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке