Prayagraj Kumbh Mela: कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू कुठून येतात, जातात कुठे?नागा साधूंचं रहस्य काय?

Описание к видео Prayagraj Kumbh Mela: कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू कुठून येतात, जातात कुठे?नागा साधूंचं रहस्य काय?

#BolBhidu
#NagaSadhu #KumbhMela2025

प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला अवघे काही दिवस उरलेत. १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या कुंभमेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यामुळं प्रयागराजसह संपूर्ण उत्तर प्रदेशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. विविध सांप्रदायातील साधूही कुंभमेळ्यात सहभागी होतात. यामध्ये शैव, वैष्णव, उदासीन, नागपंथी, परी आणि किन्नर सांप्रदायातील साधूंचा समावेश असतो. पण त्यातही कुंभमेळ्यातल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात ते म्हणजे नागा साधू.

डमरू डफलीच्या नादात तल्लीन झालेले विवस्त्र नागा साधूंबदेदल कायमंच आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्याचं कारण म्हणजे या नागा साधूंचं दुर्मिळ असलेलं दर्शन. कुंभमेळा सोडला तर नागा साधुंचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नसतो, असं सांगितलं जातं. दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याला हे नागा साधू येतात आणि नंतर निघून जातात. ते कुठून येतात, कुठे जातात याबद्दल कोणालाही कसलीही माहिती नसते. त्यामुळं नागा साधू म्हणजे नक्की असतात कोण, त्यांना नागा साधू का म्हटलं जातं, ते कुठे असतात, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि नागा साधूंबद्दलचं रहस्य या व्हिडिओमधून जाणून घेऊयात

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке