चिकन पोपटी | Popti | How to make Popati | Marathi Recipe

Описание к видео चिकन पोपटी | Popti | How to make Popati | Marathi Recipe

पोपटी साठी सर्वात महत्वाच्या असतात त्या पोपटीच्या शेंगा
गावठी वालाच्या या शेंगा रायगढच्या या पट्ट्यात डिसेंबर ते मार्च या मोसमात येतात म्हणूनच याseason मध्ये पोपटी केलीय जाते
आणि पोपटाच्या चोची प्रमाणे या शेंगाच्या आकारवरूनच कदाचित या पदार्थाला पोपटी हे नाव पडलं असावं असं इथले गावकरी सांगतात
या शेंगा व्यतिरिक्त पोपटी साठी वापरला जातो भांबुर्डीचा पाला
भांबुर्डीच्या पाल्याला गोरखमुंडी, वसई विरार मध्ये बोडंथोला काही ठिकाणी कोंबडा तर रायगढ़ मध्ये भामरुड असे म्हणतात
पावसाळ्या नंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात सर्वत्र उगवतो
आणि या पाल्यावरच पोपटीचा खेळ रंगतो
पोपटी हि रात्रीच लावतात व शक्यतो पुरुष मंडळीच पोपटी लावण्याचे काम करतात
आम्हाला पोपटी लावायला मदत केली तो दिनेश पाटील आणि सुभाष दादांनी
सर्व प्रथम दादांनी संध्याकाळीच भांबुर्डीचा भरपूर पाला खुडून आणला
शाकाहारी आणि मांसाहारी असे पोपटी चे दोन प्रकार केले
मांसाहारी पोपटी चिकन घालूंबनवली जाते तर शाकाहारी मध्ये कंदमुळे आणि बटाटे घातले जातात
या साठी मसाले हि खूप साधे लागतात आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पूड, गरम मसाला पूड, हळद साधं मीठ व जाडा मीठ
प्रथम चिकन स्वछ धुऊन घेतलं
त्या सोबत शेंगा धुतल्या
त्या चिकन ला हळद, लाल मिरची पूड, आलं लसणाची पेस्ट मीठ लावून घेतला
वरून याला गरम मसाला पूड लावली व चिकन अर्धा तास मुरवत ठेवून दिलं व्हेज पोपटी साठी बटाटे धुऊन घेतले आणि त्यांना मधून एक चीर दिली
या चिरी मध्ये मग लाल मिरची पूड व मीठ भरले व वेगळे ठेवून दिले
आता केळीच्या पानात मसाल्यातील थोडं थोडं चिकन बांधायला सुरुवात केली
चिकन अशा छोट्या छोट्या पुड्या मध्ये बांधून घ्या
आता सुरु करूया
पोपटी लावायला
मोठ्या मडक्यात तळला भरपूर भांबुर्डीचा पाला घातला
त्यावर चिकन च्या पुडक्यांचा रचला
मध्ये मध्ये जाड मीठ पसरवला
मग त्यावर शेंगाचा थर लावला
पुन्हा पुन्हा जाड मीठपसरवला
आणि सर्वात वर अंडी ठेवली
हे मडकं साधारण ९० टक्के भरून झाला कि बाकीची जागा भांबुर्डीच्या पाल्याने भरले
पाल्याने सील बंद केलेलं हे मडकं मग एका उघड्या माळरानात नेल नेलं
पाला पाचोळ्याने भरलेल्या एका लहानश्या खड्यवर हे मडकं उपडे ठेवले
मडक्याच्या सभोवतालीने काटक्या लाकडाची ढालपी लावली
नंतर त्यावर पेंढा टाकला व हा पेंढा पेटवून सुरु केली पोपटी
आता जवळ जवळ ४० ४५ मिनिट हि पोपटी अशीच पेटत ठेवतात
पोपटी नीट शीजलीये कि नाहीये हे पाहण्या साठी मदत करतो करतो भांबुर्डीचा पाला
याचा विशेष सुवास दरवळला कि इकडचे स्थानिक लगेच समजून जातात कि पोपटी शिजली
आता निखारे बाजूला करून मडके जाळावरून वेगळे काढले जाते व गोणपाटावर उपडे केले जाते
मग यातील पाला बाजूला काढून घेतला जातो व आतली पोपटी वेगळी केली जाते
आणि मग सुरु होते पोपटी ची खरी मज्जा
चला मग येताय ना आमच्या सोबत पोपटी करायला



Regards



Being Marathi

https://www.facebook.com/beingmarathi...

  / being_marathi_recipes  

  / beeingfilmy  

https://plus.google.com/b/10260456180...

https://www.linkedin.com/home?trk=nav...

  / pins  

https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

Комментарии

Информация по комментариям в разработке