गावरान काळ्या मसाल्याचं वाटण | gavran kala masala watan | चिकन, शेवगा हंडी |Kanchan Bapat recipes |

Описание к видео गावरान काळ्या मसाल्याचं वाटण | gavran kala masala watan | चिकन, शेवगा हंडी |Kanchan Bapat recipes |

हा गावरान चवीचा काळा रस्सा कोणत्याही मसाल्याच्या भाजी साठी वापरता येईल.. यासाठी कोणताही तयार मसाला वापरण्याची गरज नाही. हा मसाला जर फ्रीज करून ठेवला तर हवा तेव्हा हवी ती भाजी बनवण्यासाठी वापरता येईल.


साहित्य आणि कृती

पाव वाटी गरम तेलावर 2 मध्यम आकाराचे कांदे, 8-10 लसुण पाकळ्या, 1 tbsp आलं, 2 tbsp बारिक चिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या, 2 tbsp धने, पाव वाटी सुकं खोबरं, प्रत्येकी 2 tbsp डाळवं, खसखस आणि तिळ हे सगळं परतून घ्यायचं.
हे सगळं लालसर झाल्यावर त्यात 4-5 लाल मिरच्या, 4-5 लवंगा, 2-3 तमालपत्र, 2 tbsp दगडफुल, 1 चक्रीफुल, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 मिरे हे सगळं काळसर होईपर्यंत परतून घ्यायचं.
थोडंसं थंड झाल्यावर किंचित पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं.

अर्धी वाटी तेलावर मोहरी, हळद, तिखट हवी तर साखर घालून त्यावर वाटलेला मसाला घालून परतायचं. तेल सुटल्यावर मीठ, गावरान कोथिंबीर आणि 5-6 वाट्या गरम पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
लगेचच वापरायची नसेल तर पाणी न घालता काचेच्या डब्यात भरून फ्रिझमध्ये ठेवायचं.. ऐनवेळी उपयोगी पडते.

Комментарии

Информация по комментариям в разработке