मौजे -कोन्हवली शिमगा उत्सव आगमन सोहळा part 1 Moujhe Konhavali tal Mandangad

Описание к видео मौजे -कोन्हवली शिमगा उत्सव आगमन सोहळा part 1 Moujhe Konhavali tal Mandangad

शिमग्याची चाहुल लागल्यापासून ते शिमगोत्सव संपेपर्यंत आम्ही कोन्ह्वलीकर प्रत्येक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. उगवणाऱ्या प्रत्येक नवीन दिवशी एक खेळ किंवा प्रथा, रूढी घेत आम्ही वावरतो.नवसाची पालखी म्हणून कोन्हावली गावाची पालखी संपूर्ण रत्नागिरी जिल्हात आणि मंडणगड तालुक्यात प्रसिध्द आहे श्रीरंग भैरी देवाची पालखी आणि संकासूर भक्ताच विशेष लक्ष वेधतात सणानिमित्त होणारी धमाल अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते. नातेवाई, पय - पावणे यांच्या भेटीगाठी होतात. देवांच्या भेटीनिमित्त आसपासच्या गावांमध्ये जाताना येणारा अनुभव तुम्हाला अधिक समृद्ध करतो. जगण्याकरता एक नवी ऊर्जा देतो. सारा क्षीण टाकत आम्ही प्रत्येक कोन्हावालीकर शिमगोत्सव साजरा करतो. ग्रामदेवता आणि तिच्या या सोहळ्यात केव्हाच विघ्न आलं नाही. पण, यंदाचा शिमगोत्सव न पाहिलेला असाच आहे. देवाची पालखी घरी येणार म्हटल्यावर केली जाणारी जय्यत तयारी ही 'शाही' असते. याच निमित्तानं अनेकांचे पाय घराला लागतात. सुख - दु:खाची चौकशी होते. आपल्या मुळगावापासून लांब असलेला प्रत्येक कोकणी माणूस सर्व अडथळे पार करतो आणि गावी येतो. आपल्या सुना - नातवंड यांची भेट, ओळख सर्वांना करून देतो. धावपळीच्या काळात मागे सरलेली अनेकी नाती इथं नव्यानं सुरू होतात. अनेक नाती इथं जुळतात. दुरावलेल्या मनामध्ये आपलेपणा निर्माण होतो. मनात असलेली अडी याच देवाच्या साक्षीनं टाकून दिली जाते. आलेली मरगळ याच ग्रामदेवतेला साक्षी ठेवत झटकून दिली जाते. सखे, सोबती, सवंगडी यांच्यात रंगणारा गप्पांचा फड हा ऐकण्या सारखा असतो. अनेक वर्षे दुरावलेली नाती, त्यांचं मुळ या शिमगोत्सवात गवसतं किंवा ते शोधलं जातं. देव भेटीची ओढ हे शिगमोत्सवाचं कारण मुख्य. पण, त्याचवेळी सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक आणि आर्थिक देवाण- घेवाणीचे कंगोरे दु्र्लक्षित करून कसे चालतील? त्यामुळे देवाच्या या सोहळ्यात पडणाऱ्या खंडाच्या या बाजु देखील महत्त्वाच्या अशाच आहेत.




आमची आमच्या ग्रामदेवतेशी असलेली विण अधिक घट्ट होते ती शिमगोत्सवाच्या काळात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अनेक गोष्टी दिल्या जातात. शिकवल्या जातात त्या याच काळात. आमचा शिमगा ग्लोबल झाला. पण, त्यातील गोडवा कमी नाही झाला. जगासोबत आम्ही कोकणी माणसं देखील ग्लोबल झालो. पण, असं असलं तरी आम्ही आमच्या रूढी, परंपरा जपल्या. त्याच भावनेनं आणि श्रेद्धेनं.आम्ही त्या दुसऱ्या पिढीला देखील दिल्या अगदी सहजपणे आणि त्यांनी त्या स्वीकारल्या देखील अगदी सहजपणे. देवाच्या भेटीची ओढ काल देखील होती, आज देखील आहे आणि उद्या देखील राहिल. देवाची भेट होणार नाही. देव घरी येणार नाही या कल्पनेनं आमचा कंठ दाटून येतो. जगात कुठंही असलं तरी आमचं मन मात्र शिमगोत्सवाच्या काळात या देवाच्या चरणी असतं. प्रत्येक कोकणी माणसाचं आणि त्याच्या ग्रामदेवतेचं नातं हे खरं पाहायाला गेलं तर कोणत्याही नात्यापेक्षा अधिक दृढ आहे. इथंच आम्ही व्यक्त होतो. व्यक्त होण्याची हीच आमची हक्काची जागा. पण, सारे बंध तोडून आमचं मन केव्हाच त्या ग्रामदेवतेच्या चरणी लीन झालंय!




#konhavaliShimaga ustav
#konhavaliSnakasur
#sankasur
#konhavalikhalubaja
#khalubaja
#mandangadpalkhisohla
#shreerangbhairi
#bhairi
#konhavlipalakhi
#kokanatalyapalakhya
#gavdevipalki
#bhairidevipalakhi
#navasacharaja
#SRB Production
#gavadevimajhimauli
#शेवरे
#Vardhanpata
#Shevarevardhanmatakathi
#Shewarekathi
#जय वर्धानमाता शेवरे व वडवली गाव पालखी भेट | होळीचा तिसरा दिवस
#kokanholi,
#shimgautsav2022
#aapalkokan

Комментарии

Информация по комментариям в разработке