Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav

  • Tirth Vaibhav
  • 2024-08-04
  • 319
काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav
SataraShivmandirWai sataramaharashtra tourismtravel maharashtrawaiकाशी विश्वेश्वरकृष्णा नदीमहादेव मंदिरवाई साताराशिव मंदिरश्रावण सोमवारसातारा
  • ok logo

Скачать काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai @Tirthvaibhav

काशीविश्वेश्वर मंदिर वाई सातारा | Shiv Temple In Wai ‎@Tirthvaibhav 
#Wai
#satara
#shivmandir
#श्रावण_सोमवार
#श्रावण
#वाई
#सातारा
#शिवमंदिर
#hindutemple
नमस्कार मित्रांनो आजपासून पवित्र अशा श्रावण महिण्यास सुरूवात होत आहे. श्रावण हा भगवान शिवाच्या आराधनेचा महिना. या श्रावण महिण्यात भगवान शंकराच्या देवस्थानाचे दर्शन आपण श्रावण स्पेशल या सिरीज अंतर्गत घेणार आहोत. श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या जागृत मंदिराची सफर मी आपल्याला तीर्थ वैभव चॅनेलच्या माध्यमातून घडविणार आहे. त्याची सुरूवात आपण  वाईमधील मराठाकालीन मंदिर वास्तुशैलीचा सुंदर अविष्कार असलेल्या 'काशीविश्वेश्वर'च्या मंदिरापासून करणार आहोत.

 सातारा शहराच्या पश्चिमेस बत्तीस किमीवर कृष्णा नदीकाठी वसलेले वाई हे इतिहासप्रसिद्ध निमशहरी गाव आहे. ते तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी तसेच वेदविद्या व संस्कृत भाषेच्या अध्ययनाचे केंद्र म्हणून ख्यातनाम आहे. बॉम्बे गॅझेटिअर (१८८५) मधील माहितीनुसार वाईत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लहान- मोठी सुमारे शंभरच्या आसपास मंदिरे होती. यांतील बहुसंख्य मंदिरे छत्रपती शाहू महाराज (कार. १७०७-१७४९) यांच्या व त्यानंतरच्या पेशवे काळात विशेषत: रास्ते घराण्याच्या कारकीर्दीत बांधली आहेत. सध्या कृष्णा नदीकाठावरील ढोल्या गणपतीचे मंदिर आपण व्हिडोओमध्ये पहात आहोत. तर या मंदिराच्या उत्तरेस काशीविश्वेश्वराच मंदिर आहे.
काशीविश्वेश्वर मंदिर हे या वास्तुशैलीचा एक वैशिष्टय़पूर्ण नमुना आहे. हे मंदिर प्रशस्त अशा ३३२८ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या आयताकार दगडी प्रकारात सुमारे सव्वा मीटर उंच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख बांधले आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी इ. स. १७५६/५७ मध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्चून बांधल्याची नोंद कागदोपत्री आढळते. त्यांनी या मंदिरास आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ 'काशीविश्वेश्वर' हे नाव दिले. मंदिरास नंदीमंडप, मुख्यसभागृह, अंतराल व गर्भगृह अशी मंदिराची चार स्वतंत्र दालने आहेत. याशिवाय नंदी मंडपाच्या पाठीमागे पूर्वेस प्रशस्त सभामंडप आहे. त्यांतील आरसपानी सोळा स्तंभांवर समताल छत असून छताखाली हंडय़ा, झुंबरे लावण्यासाठी छतास लोखंडी हळगे, कडय़ा, आकडे इत्यादी लावले आहेत.
सभागृहाच्या दोन्ही बाजूंस उंच व घडीव दीपमाला स्तंभ आहेत. त्यांची भव्यता नजरेत भरते. या स्तंभांवर वरच्या बाजूस कमळाकृती शिल्प असून  तीत कुंभाची रचना आहे. त्यांची बांधणी अष्टकोनाकृती असून त्यांवर दिवे लावण्यासाठी हातखुंटय़ा बसविलेल्या आहेत. अगदी वरच्या टोकास टेंभा लावण्याची व्यवस्था केली आहे.
मूळ मंदिराच्या गाभाऱ्यात पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खोलगट जागी रेखीव महादेवाची मोठी पिंड आहे. गर्भगृहाचे छत उघडलेल्या छत्रीप्रमाणे घुमटाकृती आकाराचे असून जसजसे वर जाईल तसे लहान होत गेल्याचे जाणवते. मुख्यसभागृह अंधार असून डाव्या- उजव्या कोनाडय़ांत अनुक्रमे गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे दार अलंकृत असून द्वारशाखेत तीन कुंभ, पुष्पशाखा, प्राणी शाखा (माकडे), मध्ये कुंभशाखा अशी रचनात्मक आकृतिबंध शिल्पे असून दोन्ही बाजूंस प्रत्येकी एक प्रमाणबद्ध द्वारपालाची सुबक मूर्ती आहे.

 प्रकाशासाठी गाभाऱ्यात दोन (दक्षिणोत्तर) जाळीदार गवाक्षे ठेवली आहेत. त्यांतील दक्षिणेकडील गवाक्षाच्या बाहेरील बाजूस नागाचे एक चमत्कारिक शिल्प आहे. त्यात एका नागाच्या तोंडातून त्याच्या शेपटीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता मनुष्य दुसऱ्या नागाच्या तोंडाकडे येऊन पोहोचतो.  गर्भगृहाच्या उंबरठय़ावर पुढे आलेली दोन कीर्तिमुखे असून गणेशपट्टीत मध्यभागी ललाटबिंबावर सुबक गणेश मूर्तिशिल्प आहे.  प्रवेशद्वाराच्या उंबरठय़ावर पुन्हा एक कीर्तिमुख कोरले आहे.सभागृहाच्या समोरील पाऊण मीटर उंच चौथऱ्यावर आणि नऊ मीटर क्षेत्रफळाच्या नंदी मंडपात काळ्या वालुकाश्मात घडविलेली कलाकुसरयुक्त झूल परिधान केलेली काळी कुळकुळीत, गुळगुळीत व चमकदार नंदीची भव्य बैठी मूर्ती आहे. हा नंदी अतिशय देखणा व रुबाबदार असून त्याची उंची (बसलेल्या नंदीची) सव्वा मीटर आणि लांबी पाऊण मीटर आहे; तर त्याच्या पाठीची रुंदी एक मीटर भरेल! बैठय़ा नंदीची ही उंची, त्यावरून त्याची भव्यता लक्षात येते.  या नंदीला गळ्यात माळा, साखळ्या हे अलंकार घातलेले आहेत आणि त्याच्या पाठीवर झूल असून त्याला घंटा खोदल्या आहेत.  पुढचा उजवा पाय दुमडून डावा वर उचलून तो डौलदार मुद्रेत गर्भगृहाकडे मुख करून विसावला आहे.

 काशीविश्वेश्वर मंदिराच्या शिखरावर एकूण ११० चुनेगच्चीतील मूर्तीचे अलंकरण आहे. त्यांपैकी काही मूर्ती फुटलेल्या असून सुमारे ८० ते ८५ मुर्ती सुस्थीतीमध्ये आहेत.
या परिसरात ढोल्या गणपती मंदिराच्या पाठीमागण्या बाजूस कृष्णा नदीच्या काठावर अनेक छोटी छोटी मात्र जागृत मंदिरे आहेत. या ठिकाणी नियमीतपणे पूजा अर्चा केली जाते.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]