TET Paper Leak : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; कसा झाला गैरव्यवहार?

Описание к видео TET Paper Leak : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; कसा झाला गैरव्यवहार?

पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. सुपे यांच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत. रिचेकिंगवेळी गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय. सुपे यांच्या घरातून 89 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत. रिचेकिंगवेळी गैरव्यवहार झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 

30 नोव्हेंबरला एबीपी माझाने आरोग्य भरती गट ड चा पेपर फुटल्याच वृत्त दिलं. त्यासाठी सैन्याच्या गुप्तचर विभागांकडून अटक करण्यात आलेल्या हवालदार अनिल चव्हाणचे एका एजंटसोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर ठेवली.  

तोपर्यंत पेपर फुटलाच नाही असा दावा करणाऱ्या पोलीसांना या प्रकरणाचा तपास सुरु करणं भाग पडलं. 
पिंपरी-चिंचवड पोलीसांनी तपास न केल्याने पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि विजय मुराडेला या प्रकरणात औरंगाबादमधून एक डिसेंबरला अटक केली. या विजय मुराडेकडे आरोग्य विभागाचा पेपर टेलिग्रामवर आला होता. 
त्यानंतर या प्रकरणातील अटक सत्राने वेग घेतला आणि पेपर फुटीत सहभागी असलेले एजंट्स आणि अॅकडमी चालवणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली. 
परंतु या प्रकरणात महत्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा पुणे सायबर पोलीसांनी लातुरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगीरेला सात डिसेंबरला अटक केली. 
बडगिरेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. मात्र त्यानंतर पुणे पोलीसांनी आठ डिसेंबरला आरोग्य विभागातील सहसंचालक डॉक्टर महेश बोटलेला अटक केली.  ही आतापर्यंतची या प्रकरणातील सर्वात मोठी अटक होती. या प्रकरणात चौकशी सुरु असतानाच ही पुणे पोलिसांना म्हाडाचा पेपर ही फुटणार असल्याच पोलीसांना समजलं. 
बारा डिसेंबरला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री म्हणजे अकरा डिसेंबरला पुणे पोलिसांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला ताब्यात घेतलं. 
प्रितेश देशमुखच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली. 
प्रितेश देशमुखच्या घरातून पुणे पोलीसांना तपास करताना टी ई टी परिक्षेशी संबंधित डाटा पेन ड्राइव्हमध्ये सापडला.  त्याचबरोबर टी ई टी परिक्षेतील उमेदवारांची ओळखपत्रंही मिळाली. 
 आता पुणे पोलीसांनी त्यांचा तपास टी टी परीक्षेवर केंद्रीत केला. 
 या तपासात प्रितेश देशमुख सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे सहभागी असल्याच पुणे पोलीसांना समजलं.
 पुणे पोलीसांनी 16 डिसेंबरला तुकाराम सुपेकडे चौकशी सुरु केली.
तुकाराम सुपेच्या घरातून पोलीसांना एकोणव्ववद रुपयांची रोकड सापडली. आणि 17 डिसेंबरला पोलीसांनी तुकाराम सुपेला अटक केली.

Комментарии

Информация по комментариям в разработке