902) नीलकंठ / श्री कंठ । Arvind P Patil

Описание к видео 902) नीलकंठ / श्री कंठ । Arvind P Patil

🕉👏श्री सद्‌गुरुकृपा -( प्रवचन ९०२, दि. २७/८/२४ )श्री कृष्ण भगवान विवेकी आणि वैरागी होते, आत्मज्ञानी महापुरुष होते. विश्वाच्या कल्याणासाठी पालनहार विष्णु भगवान देह धारण करुन आले होते. त्यांच्या महोत्सव प्रसंगी महापुरुष कसा असतो हे आपण पहाणार आहोत.
समुद्र मंथन प्रसंगी हलाहल म्हणजे वीष निर्माण झाले. विश्वाच्या कल्याणासाठी ते शिव शंकराने प्राशन केले. ते नीलकंठ झाले, त्यांचा कंठ नीळा झाला. ते आभूषण ठरले. त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, ती संपूर्ण जगाला मिळाली.
पार्वती मातेला पती म्हणून शिवशंकर मिळाले. ती सतत त्यांची काळजी करायची. शिवजी पती मिळून पार्वती मातेची भिती चिंता गेली का ? ती निर्भय आणि निःशंक झाली का ?
त्याच प्रमाणे संपूर्ण विश्वाला लक्ष्मी मिळाली ते विश्व श्री कंठ
झाले का ? लक्ष्मी मिळाल्यावर संपूर्ण विश्वाने निर्भय निःशंक आणि समृद्ध व्हायला पाहिजे. तसे नाही झाले. विवेक आणि वैराग्य ज्याच्यामधे असते तो शिव शंकर नीलकंठ झाला. पण
विश्व श्री कंठ झाले नाही, निर्भय निःशंक झाले नाही. यासाठी
ज्ञानाची आवश्यकता आहे, विवेक वैराग्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते, तेंव्हाच आपण निर्भय निःशंक होतो.
श्री कंठ म्हणजे ज्ञानी महापुरुष शिव शंकर ! हे सामर्थ्य आपल्याला प्राप्त करायला पाहिजे. जय काडसिद्ध ॥

Комментарии

Информация по комментариям в разработке