परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व्यक्तीमत्व विशेष ..विनम्रता

Описание к видео परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व्यक्तीमत्व विशेष ..विनम्रता

🙏🏻 नमो गुरवे वासुदेवाय 🙏🏻

स्वामी महाराज व्यक्तीमत्व विशेष ..विनम्रता

तंजावरचा चातुर्मास संपल्यावर परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तिथून श्रीरंग या ठिकाणी आले. तिथे श्रुंगेरीमठाचे शंकराचार्य यांचा मुक्काम होता. श्री स्वामी महाराजांनी जगद्गुरू श्री शंकराचार्य व शारदांबेची स्तोत्रे रचून स्तुती केली. ते ऐकून आचार्य संतुष्ट झाले. त्यांनी श्री स्वामी महाराजांचे वर्णनपर एक स्तोत्र करून त्यांना ऐकविले आणि उपस्थित लोकांना ऊद्देशून श्री शंकराचार्य म्हणाले, “आपल्या समोर असलेले हे संन्यासी म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. श्रीमद् शंकराचार्यांप्रमाणे तेसुध्दा धर्मसंस्थापनेचे कार्य करीत आहेत. त्यांनी वर्णाश्रमधर्माचे काटेकोर व अत्यंत कडकडीत परिपालन करून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.” त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले की, “आचार्यांच्या या गादीवर आपण योग्य अधिकारी पुरूष असून आपल्यामुळे या गादीला शोभा आली आहे. आपले सर्व संकल्प ईश्वर पुर्ण करील.”

।। भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री सदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке