Homemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवा

Описание к видео Homemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवा

Homemade Bombil Curry | Bombay Duck Curry | ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण सोप्या पद्धतीने बनवा | easy and simple way of homemade bombil curry

साहित्य - ५-६ ओले बोंबील ( एका बोंबीलचे ३ माध्यम आकारात तुकडे ), मूठभर कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, २" आले, १५ लसूण पाकळ्या, १०० ग्रॅम भाजलेले सुकं खोबरं, घरगुती लाल मसाला ३ tbl spn, हळद १ tea spn, ५-६ कोकम पाकळ्या, ५ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - प्रथम कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, भाजलेले सुकं खोबरं यांचे वाटण तयार करून घ्या. एका पातेल्यात तेल चांगले गरम करून त्यात हे वाटण टाका आणि चांगले परतून घ्या. आता यात हळद आणि लाल मसाला टाका. मसाले तेलात मिक्स करा आणि वाटणातुन तेल बाजूला होईपर्यंत त्याला चांगले परतवा. वाटणातुन तेल बाजूला झाल्यावर त्यात कोकम टाका आणि साधारण १ ग्लास रस्स्यासाठी साधे पाणी टाका. आपल्या चवीनुसार मीठ टाका. सर्व मिश्रण घोळून घ्या. आता या रस्याला किमान ५ मिनिटे मोठ्या आचेवर उकळून घ्या. रस्याला उकळी आल्यावर त्यात बोंबील सोडा. बोंबील सोडताना आच मध्यम किंव्हा स्लोव ठेवा. बोंबील टाकून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि रस्स्यात चांगले मिक्स करून घ्या. आता गॅसची आच मोठी करा आणि १० मिनिटे शिजवा. ( १० मिनच्या वर शिजवू नये, नाहीतर बोंबील खालून जातील.) १० मिनिटांनी गॅस बंद करा आणि गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंव्हा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा , तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद !

Комментарии

Информация по комментариям в разработке