East Indian Marathi Song विश्वासाचं घर Composed & Sung By Rev. Fr. Victor A. Dalmet

Описание к видео East Indian Marathi Song विश्वासाचं घर Composed & Sung By Rev. Fr. Victor A. Dalmet

जीवन हे क्षणभंगुर आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती या जगातून जाते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबांवरील हे सर्वात मोठे संकट असते. जीवन-मरण या गोष्टी जरी आपल्या हातातील नसल्या तरी मित्र म्हणून, सहकारी म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्त्यव्य असते. जसे त्या व्यक्तीच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो, तसेच त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने एक न भरून निघणारी पोकळी तयार होते अशा या संकट प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे योग्य ठरते. परंतु कधी कधी वातावरण इतके गंभीर होते कि, आपल्याला देखील काय बोलावे… ते सुचतच नाही. “मृत्यू हे अंतिम सत्य आहे.” हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या कुटुंबावर तो असलेला सर्वात मोठा आघात असतो. जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून जाते, कि जी परत आपल्याला कधीच दिसणार नसते. अशावेळी आपल्या सर्वांनाच मोठे दुःख होते. अशावेळी तर त्या कुटुंबातील व्यक्ती या खूपच हतबल होतात. जन्म व मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या घटनेच दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात.
अशावेळी एक मित्रपरिवार म्हणून, आपले हे कर्त्यव्य असते, कि त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करणे. असे केल्याने गेलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक मानसिक आधार देऊ शकता. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता त्यासाठी आपणां सर्वांसाठी विस्वासाचं घर रेव्ह फादर व्हिक्टर हयांनी स्वतः गाणे रचून त्यांच्या सुमधूर अशा आवाजात गाईलेले ईस्ट ईंडियन मराठी सॉंग 💜

Комментарии

Информация по комментариям в разработке