सोयाबीन खत व्यवस्थापन | soybean khat niyojan | soybean fertilizer management

Описание к видео सोयाबीन खत व्यवस्थापन | soybean khat niyojan | soybean fertilizer management

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱सोयाबीन खत व्यवस्थापन | soybean khat niyojan | soybean fertilizer management👍

महाराष्ट्रात खरिफ हंगामामध्ये सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. लागवड करताना खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास अपेक्षित असे उत्पादन भेटते. सोयाबीन पिकास स्फुरद हे मुख्य खत तर गंधक हे दुय्यम खत जास्त प्रमाणामध्ये लागते.

1️⃣जमिनीची पूर्व मशागत: - सोयाबीन लागवड करण्याच्या आधी 2 - 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी. एकरी 10 गाड्या कुजलेले शेणखत + 80 किलो जिप्सम द्यावे. जिप्सम उपलब्ध न झाल्यास सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो वापरावे. शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.

2️⃣खत व्यवस्थापन - सोयाबीन पिकास एकरी 10 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश यांची गरज असते. मातीमध्ये नत्र आणि पालाश हे पुरेसे उपलब्ध असल्यास 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खत एकरी द्यावे. मातीमध्ये पालाश हे पुरेसे उपलब्ध असल्यास डी. ए. पी. 50 किलो प्रति एकरी द्यावे. मातीमध्ये नत्र आणि पालाश कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यास 12:32:16 हे खत प्रति एकरी 50 किलो द्यावे. माती परीक्षांनुसार वरील पैकी कोणतेही एक खत सोयाबीन पिकास पेरणी करताना द्यावे. तसेच सल्फर ग्रॅनुअल्स 4 किलो + ह्यूमिक ग्रॅनुअल्स 4 किलो प्रति एकरी द्यावे. सांगितलेली खते लागवड करताना देणे गरजेचे आहे. काही कारणास्तव लागवडीच्या वेळी हि खते दिली नसल्यास लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी देऊ शकता.

3️⃣फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन : -

१. लागवडीनंतर २५ दिवसांनी - १९ १९ १९ - ५० ग्राम + सिवीड एक्सट्रॅक्ट ३० मिली प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी.
२. फुलोरावस्थेत - ००:५२:३४ - १ किलो + जीओलाइफ फ्लॉवरिंग किट ५१ ग्राम प्रति १५० ते २०० लिटर पाणी
फवारणी करावी.
३. शेंगा पासत असतांना - ००:५२:३४ - ७५ ग्राम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट १५ ग्राम + बोरॉन १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी.
४. शेवटच्या फवारणी नंतर ८ दिवसांनी - ००:००:५० - ७५ ग्राम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке