कविता, किस्से, गाणी.. २ तासांची No Nonsense मुलाखत | Boys Talk With Sandeep Khare | Aarpaar Marathi

Описание к видео कविता, किस्से, गाणी.. २ तासांची No Nonsense मुलाखत | Boys Talk With Sandeep Khare | Aarpaar Marathi

#SandeepKhare #आरपार


Boys Talk. ही सिरीज सुरु करायची असा विचार जेव्हा केला होता तेव्हा Boys Talk हे नाव फार निगेटिव्ह अर्थाने घेतलं जाऊ शकतं अशी आमच्या टीमला एक भिती होती. या नावाविषयी थोडे मतभेद होते. पर्याय सुचवले गेले, अनेकांची सजेशन्स घेतली गेली पण Boys Talk ला पर्याय म्हणून हटके नाव काही सूचेना. मग आम्ही विचार केला.. नाव बदलण्यापेक्षा लोकांचा नावामागचा तो टिपिकल अप्रोच आपण बदलू शकलो तर? झालं.. मनाशी पक्क केलं आणि सेगमेंटचं Boys Talk हेच नाव आम्ही फायनल केलं.. आज पहा या Boys Talk मध्ये कोणी स्त्रियांबद्दलच्या आदरावर बोलतंय, कोणी लहान वयात आलेल्या Maturity वर बोलतंय, कोणी आईबाबांच्या म्हातारपणावर बोलतंय, कोणी प्रेमावर बोलतंय तर कोणी एकटेपणावर बोलतंय.

आज आपल्याशी संदीप खरे बोलतायत. एक उत्तम कवी ही त्यांची ओळख आहेच पण त्या पलीकडे जाऊन ते म्हणतात, त्यांना आजच्या नो नॉनसेंस पिढीचं कौतुक वाटतं.. ते म्हणतात, कविता समजायला वय लागत नाही.. ते म्हणतात, लहान मुलांचं शोषण त्यांना अस्वस्थ करतं.. ते म्हणतात, लोकांमध्ये नसणारा सिविक सेन्स त्यांना पचनी पडत नाही. आता इथे अजून काही लिहिण्यापेक्षा तुम्ही थेट मुलाखत पहा. वेळेचं वावडं असलं तरी व्हिडीओ स्पीड आहे तोच ठेवा कारण, त्याशिवाय मजा नाही. २ तास खर्ची पडतील पण तुम्ही रिग्रेट नक्की करणार नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке