रंगपंढरी Face-to-Face: Amol Palekar on Direction

Описание к видео रंगपंढरी Face-to-Face: Amol Palekar on Direction

जगविख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर ह्यांचा आज ७५ वा वाढदिवस. विशेष म्हणजे अमोल सर आज २५ वर्षानंतर 'कसूर' ह्या हिंदी नाटकाद्वारे अभिनेते म्हणून पुन्हा रंगभूमीवर अवतरणार आहेत. ह्या दुग्धशर्करा योगानिमित्त सादर करत आहे रंगपंढरीचा खास एपिसोड - अमोल पालेकर on Direction.

१९७० च्या दशकातील समांतर मराठी रंगभूमीवर अग्रणी असलेल्या अमोल सरांनी नाटकात सतत नवीन आणि धाडसी प्रयोग केले. पारंपरिक कमानी रंगमंचाची चौकट मोडून मराठी रसिकांना पहिल्यांदाच समीप नाट्यानुभव देणारे 'गोची' हे नाटक, आणिबाणीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 'जुलूस' चे भारतभर केलेले दौरे, आवाजाचे अनेक नवे पैलू प्रेक्षकांसमोर सादर करणारे दिवाकरांच्या अप्रकाशित साहित्यातील 'आंधळे' हे लघुनाट्य, रंगमंचावर एकाच वेळी घडणारी निरनिराळी संभाषणे सिनेमॅटिक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवणारे एलकुंचवार लिखित 'पार्टी' ... अशा अनेक अनोख्या प्रयोगांतून मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या रंगसंवेदना अधिक समृद्ध केल्याबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार आणि इतर अनेक मानसन्मान अमोल सरांना मिळाले आहेत.

१९७३ साली सादर झालेल्या 'गोची' ह्या मुलखावेगळ्या नाटकाच्या case study द्वारे अमोल सर उलगडताहेत त्यांचे नाट्यविचार आणि त्यांची दिग्दर्शनाची प्रक्रिया.

Комментарии

Информация по комментариям в разработке