Usha Kakade Production House Launch | Rinku Rajguru | Sonali Kulkarni | Sumedh Mudgalkar

Описание к видео Usha Kakade Production House Launch | Rinku Rajguru | Sonali Kulkarni | Sumedh Mudgalkar

मुंबई : बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या 'उषा काकडे प्रॉडक्शन्स'च्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शन निर्मित 'विकी : द फुल ऑफ लव्ह' या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली.

मुंबईतील ताज लँड्स एंड येथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेत्री इशा कोप्पीकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, स्मिता गोंदकर, तनिषा मुखर्जी, गौहर खान, कोरियोग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, उद्योजक संजय काकडे, निर्माती उषा काकडे, 'विकी' चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ, कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुद्गळकर, अशोक पंडित यांच्यासह हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती.

#marathi #marathiactress #marathiactor #trending #redcarpet #rinkurajguru #sumedhmudgalkar #sonalikulkarni #smitagondkar #abhijeetkhandkekar

Комментарии

Информация по комментариям в разработке