एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund

Описание к видео एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund

एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Scam

२००७ – ०८ चा काळ. आमच्या शेजारच्या गावात एक प्रसिद्ध जनावरांचा डॉक्टर राहायचा. त्याचं नाव घेणार नाही. जनावरांना बरं करण्यात त्याचा हातखंडा होता. त्यानं हात लावलाय अन जनावर बरं झालं नाय असं कधीच झालं नाय त्यामुळं पंचक्रोशीत त्याला खूप मान होता. लोक त्याच्याकडं आदरानं पाहायची. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी काय झालं माहिती नाय, त्या डॉक्टरनं चक्क डॉक्टरकी सोडून दिली अन त्यो PACL नावाच्या कोणत्या तरी चीटफंड कंपनीत कामाला लागला. ते PACL म्हणजे पर्ल्स एग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पर्ल्स ही कंपनी. आता पर्ल्स ह्ये नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या शिट्ट्या वाजल्या असतील. का ते तुम्हांला पुढं व्हिडीओ दरम्यान समजेलचं. तर तो डॉक्टर पर्ल्स कंपनीचा एजंट झाला होता. तो त्याच्या गोड वाणीनं लोकांना भुरळ पाडायचा अन पर्ल्स कंपनीमध्ये लोकांना गुंतवणूक करायला सांगायचा. तो म्हणायचा, तुम्ही घरबसल्या तुमचा पैसा कामाला लावा तुम्हाला कंपनी एवढ्या एवढ्या वर्षात १२ टक्क्यानं रिटर्न देणारंय. बर दारात फोर व्हीलर, फॉरेन ट्रीप असलं काय बाय होतचं. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून भागातल्या शेकडो लोकांनी पर्ल्समध्ये गुंतवणूक केली. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी. मिनिमम रक्कम पन्नास हजार ते maximum ५ लाखांपर्यंत. डॉक्टरनं कंपनीला चांगला रिजल्ट दिला म्हणून कंपनीनं त्याला नवी कोरी ७ सीटर फोर व्हीलर गिफ्ट दिली. डॉक्टर सिंगापूर, मलेशियाला जाऊन आला. ही सगळी प्रगती डॉक्टरनं निव्वळ एका वर्षाच्या आत साध्य केली होती. त्याच्याकडं पाहून भागातले आणखी काही तरुण पोरं पर्ल्स कंपनीत जॉईन झाली आणि बघता बघता त्यांची एक साखळी निर्माण झाली. पुढची सात आठ वर्षे तसाच कारभार सुरु राहिला अन २०१४ साली एक बातमी आली की, पर्ल्सच्या संचालकानं ६०००० कोटींचा घोटाळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक केलीये. त्ये ऐकून देशातल्या करोडो गुंतवणूकदारांसकट पर्ल्स कंपनीचे एजंट यांची सुद्धा पाचावर धारण बसली. कारण बातमी झळकल्यानंतर सैरभैर झालेल्या लोकांनी आमचे पैसे रिटर्न करा म्हणून त्या एजंटांची गचुंडी धरली. काही एजंटांना मारहाण ही झाली. त्यात आमच्या शेजारच्या गावातला तो जनावरांचा डॉक्टर सुद्धा होता. लोकांच्या भीतीनं त्यानं स्वतःची जमीन, घर दागिने गहाण ठेवले, प्रसंगी विकले अन लोकांचे पैसे भागवण्याचा प्रयत्न केला. पण रक्कम थोडीथोडकी नव्हती. अजून तो छोटे मोठे धंदे करून एकाएकाचे पैसे फेडतोय. आता त्याच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं त्याला जनावरांना तपासायला ही कुणी बोलवत नाही. त्याच्यासारखीचं गत भागातल्या शेकडो एजंटांची आहे. काहींनी तर त्याकाळी टेन्शनमध्ये जीवनयात्रा संपवल्याच्या ही बातम्या आल्या होत्या आणि आजतागायत लाखो लोकं पर्ल्स कंपनीकडून वसूल होणाऱ्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. पण याची सुरुवात नेमकी कशी झाली होती ,कसं एका साधारण दूध विक्रेत्यानं देशातील लोकांना ६० हजार कोटींचा गंडा घातला, हा पर्ल्स घोटाळा नेमका काय होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारे....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#paclrefund latest news
#paclnewstoday
#pacl
#paclrefundhowtoapply
#paclindialimited
#paclnewstoday2023
#paclindialimitedsepaisekaisenikale
#paclnews
#paclkapaisakabmilega
#paclnewstodaytamil
#paclrefund
#paclcertificatenumberkaisenikale
#mahadevbettingapp
#mahadevbook
#mahadevbooknews
#mahadevbettingappscam
#mahadevbookonlinebetting
#mahadevbettingappkyahai
#mahadevbookownermarriage
#mahadevbookapp
#mahadevbetting
#mahadevbettingnews
#mahadevbettingappcase
#mahadevapp
#mahadevbettingapp
#mahadevappscam

Комментарии

Информация по комментариям в разработке