पत्रकारितेतील ऋषी : गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत

Описание к видео पत्रकारितेतील ऋषी : गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत गोविंदराव तळवलकर यांचं ह्रदयविकाराच्या व्याधीनं वयाच्या 92 व्या वर्षी अमेरिकेतील क्लीवलँड इथं निधन झालं.

पत्रकारितेच्या व्यवसायातील भीष्म पितामह असं त्यांचं वर्णन करता येईल.
कला, राजकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, इतिहास अशा विविध प्रांतात गोविंद तळवलकरांनी लिलया मुशाफिरी केली आणि मराठी वाचकांना समृद्ध केलं. त्यांच्या लेखणीचा आदरयुक्त धाक त्या काळी दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत होता.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा गोविंदराव तळवलकरांनी तब्बल 27 वर्ष अत्यंत समर्थपणे वाहिली.

1994 साली त्यांच्या निवासस्थानी सुधीर गाडगीळ यांनी गोविंदराव तळवलकरांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. अरुण काकतकर यांनी ती दिग्दर्शित केली होती. मराठी पत्रकारितेचं भाषिक मर्यादेतून सीमोल्लंघन करुन तळवलकरांनी जो दबदबा निर्माण केला, त्याचा हा प्रवास....

Комментарии

Информация по комментариям в разработке