द्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

Описание к видео द्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

द्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन द्राक्ष लागवड एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन #द्राक्ष_लागवड द्राक्ष फवारणी वेळापत्रक गुणवत्तेशीर द्राक्ष उत्पादनासाठी – १) विरळणी २) गर्डलिंग ३) योग्य व्यवस्थापन ४) योग्य वेळी योग्य संजीवकाचा वापर करावा.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन द्राक्ष लागवड कशी करावी #Agrowone
खरड छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी वेळेवर करुन छाटलेल्या काड्या व पाने बांधावर न टाकता जाळून नष्ट कराव्यात.
छाटणीनंतर खोड व वलांड्यावरील मोकळी झालेली साल काढावी.द्राक्ष लागवडीची माहिती
छाटणीनंतर लगेच वेलीच्या खोडांना आणि वलांड्यांना ब्लायटॉक्स ०.४ टक्के किंवा गेरू ३ किलो प्रति १० लिटर अथवा १० टक्के बोर्डो पेस्ट + मेथोमील ३ ग्रॅम + क्लोरापायरीफॉस नुवान ३ मि.ली + १.५ मि.ली स्टिकर प्रति लिटर पाणी या प्रमाणात पेस्टींग करावे.द्राक्ष लागवड केव्हा करावी
फुलकिडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% एस.पी. ३. मि.ली किंवा फिप्रोनील ८० % डब्ल्यू.जी. १५ मि.ली या किटकनाशकाची १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
नवीन फुट आली असताना निंबोळी अर्क ५ टक्के दोन फवारण्या आणि मॅलिथिऑन ०.१० टक्केची फवारणी करावी.
मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत मिलीबगचा प्रादुर्भाव वाढल्यास १५०० ऑस्ट्रेलियन बिटल ( क्रिप्टोलिमस भुंगेरे) प्रति हेक्टरी २१ दिवसाच्या अंतराने २ वेळेस सोडावेत.
फवारणीच्या पाण्याचा पी.एच. ६.५ ते ७ असावा.
केवड्याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील –मॅन्कोझेब (०.२%) किंवा सायमोक्झॅनील- मॅन्कोझेब (०.२%) किंवा फिनॅमिडन- मॅन्कोझेब (०.२५%) किंवा अझोक्जीस्ट्रॉबीन (२०० मिली/एकर) किंवा फेमॉक्झॅडोन + सायमोक्झॅनील (२०० मिली/एकर) किंवा क्रिसॉक्झीम येथील (२५० मिली/एकर) किंवा पायरॅक्लॉस्ट्र्रोबीन + मेटीरॅम (१.७५ ग्रॅम/लीटर) या बुरशीनाशकांच्या ५ फवारण्या छाटणीनंतर १२ दिवसांचे अंतराने आलटून-पालटून कराव्यात.
भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८०% पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मि.ली १० लिटर पाण्यात किंवा ट्रायडेमिफॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनॅझॉल ५ मि.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
10. तसेच भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी नियोजन करावे.

फळ छाटणीनंतरचे दिवस औषधे प्रमाण

४० फ्लुजीलॅझोल ४० ई.सी ०.१२५ मि.ली./लिटर

६० पेनकोनॅझोल १० ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट ०.५ मिली + ५ ग्रॅम/लीटर

७० ट्रायडेमिफॉन २५ डब्ल्यू.पी. १ ग्रॅम/लीटर

८० हेक्साकोनॅझोल ५ ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट १ मि.ली + ५ ग्रॅम/लीटर

९० मायक्लोब्युटॅनील १० डब्ल्यू. पी. ०.४५ ग्रॅम/लिटर

१०५ अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी ०.५ मि.ली./लीटर

१२० अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी ०.५ मि.ली./लीटर ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке