ऊस पिकातील तण नियंत्रण / ऊस तणनाशक / us tannashak / Sugarcane herbicide ।

Описание к видео ऊस पिकातील तण नियंत्रण / ऊस तणनाशक / us tannashak / Sugarcane herbicide ।

ऊस पिकातील जबरदस्त तणनाशक.... लव्हाळा,हराळ,वेलवर्गीय तण, सर्व तण नियंत्रण मिळेल
Trishuk. 2,4-D Sodium Salt 440 + Metribuzin 350 + Pyrazosulfuron-Ethyl 10 WG
BEST SUGAR CANE HERBICIDE SWAL TRISHUK | अब खत्म होगा एक बार में सभी घांस की सफाई - गन्ने की फसल में
ऊस पिकातील तण नियंत्रण
प्रतिबंधात्मक उपाय
निवारणात्मक उपाय
जैविक पद्धतीने तण नियंत्रण
रासायनिक तण नियंत्रण
ऊस पिकात आंतरपिकानुसार तणनाशकांचा वापर
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

देशात केवळ तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते. एकूण कृषी उत्पादनाच्या होणाऱ्या किमतीच्या किमान 10 टक्के घट निव्वळ तणांचे नियंत्रण वेळीच न केल्यामुळे होते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे; परंतु मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात. या तणांच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
प्रतिबंधात्मक उपाययामध्ये पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी- आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. मात्र, मशागत करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
1) जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
2) तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.
3) खतांच्या योग्य मात्रा योग्य वेळी देऊन उसाची जोमदार वाढ करावी.
4) गाजरगवतासारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत.
निवारणात्मक उपायउसामध्ये सुरवातीच्या काळात आंतरपीक घेतल्यास स्पर्धात्मक पद्धतीने तणांच्या योग्य बंदोबस्तासह हिरवळीच्या खताचा फायदा होतो. उसातील दोन ओळींत मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो.
या तण नियंत्रण पद्धतीत अवजाराचा वापर करून बाळबांधणी करावी, त्यासाठी दातेरी कोळप्याचा वापर करावा. ऊस साडेचार महिन्यांचा झाल्यावर रिजरचा वापर करून मोठी बांधणी करावी. मोठी बांधणी करण्याच्या कालावधीपर्यंत म्हणजे उगवण पूर्ण झाल्यापासून तीन ते साडेचार महिन्यांपर्यंत वेळोवेळी आंतरमशागत करावी, यामुळे तणांचे प्रमाण कमी होते.
जैविक पद्धतीने तण नियंत्रणया पद्धतीत तणांवर जगणाऱ्या किडी आणि रोगजंतू यांद्वारे तण नियंत्रण करता येते. उदा. गाजरगवत या तणाचे निर्मूलन झायगोग्रामा बायकलरॅटा (मेक्‍सिकन भुंगा) या जैविक कीटकांद्वारे करता येते.
रासायनिक तण नियंत्रण

टीप - ऊस उगवल्यानंतर वरंब्यावरील तणांवर तणनाशक फवारावे. तणनाशक ऊस पिकावर पडू देऊ नये. उभ्या उसात तणनाशक फवारणी पंपासाठी डब्ल्यूएफएन- 40 (व्ही आकाराचा) नोझल वापरावा व नोझलवर प्लॅस्टिक हूड बसवावे.
ऊस पिकात आंतरपिकानुसार तणनाशकांचा वापरउसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही; परंतु आवश्‍यकतेनुसार खुरपणी करावी व खाली दिल्याप्रमाणे निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
शिफारशीनुसार योग्य प्रमाणात व वेळेवर तणनाशकांचा वापर करावा.
तण उगवणीपूर्वी तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे, संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे.
तणनाशके फवारताना मागे- मागे सरकत यावे व फवारलेली जमीन तुडविली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.
तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये, फवारणी केलेल्या क्षेत्रातील चारा जनावरांना वापरू नये.

Комментарии

Информация по комментариям в разработке