तुंबाड चित्रपटातील वाडा | Sardar Purandare Wada from Tumbbad |

Описание к видео तुंबाड चित्रपटातील वाडा | Sardar Purandare Wada from Tumbbad |

तुंबाड चित्रपटातील वाडा | Sardar Purandare Wada from Tumbbad | #marathivlog #tumbbad
Sardar Purandare Wada from Tumbbad movie Finally Revealed
मी पुरंदरे वाडा बोलतोय :    • सरदार पुरंदरे वाडा सासवड | Purandare ...  
सासवडच्या इतिहासातील मानाचे स्थान : सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांचा वाडा.
तुंबाड #tumbbad या नुकत्याच आलेल्या भयपटामधील बराचसा भाग चित्रित केलेल्या, गेली ३०० वर्ष मानाने उभ्या असलेल्या या वास्तूविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी, कऱ्हा नदीच्या काठावर सरदार पुरंदरे यांचा भुईकोट वाडा आहे. अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. शनिवारवाड्याच्या २० वर्षे आधी १७०७ साली बांधलेला हा वाडा.
दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना, दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते.
वाड्याचे पूर्ववैभव अंशत: जरी शिल्लक असले तरी त्यात एकेकाळी वास्तव्य करणाऱ्या अंबाजीपंत व त्र्यंबकपंत पुरदऱ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा व कर्तृत्वाचा वैभवशाली इतिहास अक्षय टिकून राहिला आहे. निष्ठा, नम्रता, ऋजुता, सर्जनशीलता, सुसंस्कृतता लेखणीने, वाणीने आणि समशेरीने सिद्ध करणारा पुरंदरे घराणे मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व व अजोड असे होऊन गेले.




#saswad #tumbbad #purandarewada #purandar

#tumbbad #bollywood #horror #movies #cinema #horrormovies #portraits #films #tumbbadthefilm #art #hastar #india #worldcinema #pune #fantasy #thriller #mythological #mumbai

Комментарии

Информация по комментариям в разработке