Indira IVF, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र येथील सेंटर हेड डॉ. धोंडीराम भारती या व्हिडियोत IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी कार्यपद्धतीमध्ये सामील असलेल्या खर्चाविषयी चर्चा करतात. ते IVF ची कार्यपद्धती, ज्यात जोडप्याची तपासणी सामील असते, इंजेक्शन्स देणे, स्त्रीबीज बाहेर काढणे आणि एक भ्रूण बनविणे स्पष्ट करतील. नंतर, त्या भ्रूणाची जोपासणी केली जाते आणि स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केले जाते.
IVF treatment मध्ये समाविष्ट असलेल्या खर्चाची विभागणी-
• सुरुवातीच्या चाचण्यांचा खर्च रु. 10,000 ते 12,000 इतका असतो.
• इंजेक्शन्सचा खर्च रु. 70,000 ते 90,000 इतका असतो.
• ‘स्त्रीबीज काढण्याच्या’ कार्यपद्धतीसाठी रु. 20,000 ते 30,000 इतका खर्च असतो.
यांच्या व्यतिरिक्त, काही रुग्णालये Blastocyst Culture किंवा Laser Assisted Hatching सारखी प्रगत तंत्रे वापरत असतात, ज्यामुळे एकूण खर्च रु. 30,000 ते 40,000 ने वाढतो.
त्यामुळे, IVF चा सरासरी खर्च रु. 1,25,000 ते 1,50,000 इतका असल्याचे मानले जाऊ शकते. रुग्णासाठी Hysteroscopy किंवा Laparoscopy सारख्या शस्त्रक्रियेची गरज पडल्यास या खर्चात वाढ होऊ शकते. भ्रूण ट्रान्सफर केल्यावर, गर्भधारनेची खात्री होई पर्यंत(B hcg result पर्यंत) सुमारे रु. 15,000 ते 20,000 चा आणखी खर्च होऊ शकतो.
IVF करण्यासाठी रु. 1,25,000 ते 1,50,000 (प्रगत उपचारांसह) रकमेच्या खर्चाची तयारी ठेवावी लागते. IVF चा खर्च हॉस्पिटलद्वारा दिल्या जाणाऱ्या प्रगत सुविधा, त्या हॉस्पिटलचे ठिकाण, इतर विशेष सेवा यांच्यानुसार बदलू शकते. त्यामुळे, शेवटी, IVF कार्यपद्धतीसाठी स्वाक्षरी करण्यापूर्वी, एखाद्याने अतिशय काळजीपूर्वक पैशांचे नियोजन केले पाहिजे. अशा वंध्यत्व सेंटरला भेट द्या, जेथे वाजवी किमतीमध्ये उत्कृष्ट दर्जेचा उपचार दिला जातो. छत्रपती संभाजीनगर येथील Indira IVF सेंटरमध्ये आम्ही मोठ्या सवलती आणि उपचारांवर सोप्या ईएमआय पर्याय देतो. विनामुल्य सल्ला बुक करण्यासाठी कॉल करा: 18003094410
Информация по комментариям в разработке