Sharad pawar आणि Supriya Sule यांना सोडून 7 खासदारांना Ajit pawar यांनी ऑफर काय आणि का दिली ?

Описание к видео Sharad pawar आणि Supriya Sule यांना सोडून 7 खासदारांना Ajit pawar यांनी ऑफर काय आणि का दिली ?

#BolBhidu #SharadPawarNCP #AjitPawar

शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना अजित पवारांच्या वरिष्ठ नेत्यांनी ऑफर दिली आणि शरद पवारांचा पक्ष पुन्हा एकदा फोडण्याचा पडद्यामागून प्रयत्न केला अशी बातमी द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने छापलीय. ही बातमी छापल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालीय. कारण या बातमीचे टायमिंग. ८ आणि ९ जानेवारीला शरद पवार गट आपल्या महत्वाच्या नेत्यांची बैठक मुंबईमध्ये घेणार आहेत. यामध्ये शरद पवार आपल्या पक्षात भाकरी फिरवतील का याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून झडत होत्या. यासोबत शरद पवार गट अजित पवार गटात मर्ज हॉईल याच्याही चर्चा झाल्या.

खरं तर विधानसभा निवडणुकीपासूनच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का याच्या चर्चा सुरू होत्या. यात १२ डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होण्याच्या चर्चाना अधिक वेग आला.आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नेमक अजित पवारांनी शरद पवारांच्या खासदारांना काय ऑफर दिली होती? शरद पवारांचा नेमका याला रिस्पॉन्स कसा होता? आणि अजित पवार शरद पवारांचे खासदार आपल्याकडे वळवण्यासाठी एवढे प्रयत्नशील का आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке