देशातील पहिलं मधाचे गाव- मांघर | First Honey Village in India- Manghar | Mahabaleshwar | महाबळेश्वर

Описание к видео देशातील पहिलं मधाचे गाव- मांघर | First Honey Village in India- Manghar | Mahabaleshwar | महाबळेश्वर

Amazing maharashtra
Incredible India
Life in wildlife
Umakant Chavan

मांघर देशातलं पहिल मधाचे गाव. खरंतर मधाचे गाव म्हणून या गावाची निवड अगदी काही दिवसांपूर्वी झाली आणि हळूहळू ती आता जगभर पोहचत आहे. कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधु पर्यटन ही संकल्पना लवकरच इथं रुजू होत असताना आपल्याला पाहायला मिळते. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मागील 60 वर्षांपासून मधुमक्षिका पालन संदर्भात येथे कार्य करीत आहे.

मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा या उद्देशाने 1957 साली मध संचालनालयाची स्थापना महाबळेश्वर मध्ये करण्यात आली. मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी मधु पर्यटन ही संकल्पना गावागावात रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली, या संकल्पनेला साकारण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने कामकाज सुरू केले आणि महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाची देशातील पहिले मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आली.

मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या 80% शेतकरी मधमाशा पालन करतात या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फुलोरा आहे. या गावाने आज अखेर शासनाचे जवळजवळ दहा पुरस्कार मिळवलेले आहेत.

स्वच्छ सुंदर असणाऱ्या या गावात मधमाशांनी मुळे समृद्धी आलेली आपल्याला पाहायला मिळते या सगळ्याचा विचार करून मांघर गावाची निवड करण्यात आली. महाबळेश्वरला येणारे पर्यटक या गावाला भेट देऊन येथील लोकांनी संकलित केलेला शुद्ध मध चाखताना आपल्याला पाहायला मिळतात. गावात सामूहिक मधमाश्‍यांचे संगोपन केले जाते, प्रत्येक ग्रामस्थांच्याकडे कमीत कमी दहा तरी मधमाशांच्या पेटी आहेत.

मधमाशा पासून मध व इतर उत्पादने तयार करण्याकरता या गावात मधमाशांचे संगोपनाचे प्रशिक्षण देखील दिले जाते संकलित केलेला मध गावाच्या नावाने विकला जातो. गावात मधमाशांची माहिती देणारे सुंदरशी फलक लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. मधमाशांच्या परागी कारणामुळे शेती पीक उत्पादनात भरघोस वाढ होते.

राज्यातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाकडे लक्ष वाढण्याकरिता मांघरचे हे मधाचे गाव ही संकल्पना खरंच एक माईलस्टोन ठरणार आहे

Manghar is the first honey village in the country. In fact, this village was chosen as a village of honey just a few days ago and it is slowly reaching all over the world.
We will soon see the concept of honey tourism in the context of agri-tourism being introduced here. State Khadi Village Industries Board has been working in the field of bee keeping for the last 60 years
The Directorate of Honey was established in Mahabaleshwar in 1957 for the purpose of development and expansion of bees.Sinha, Chief Executive Officer, Khadi Village Industries Department, introduced the concept of Madhache Gaon with the main objective of increasing the number of bees and their positive spread to provide permanent employment to the people of forest and hill areas. Manghar village in Mahabaleshwar taluka was selected as the first honey village in the country.
About 80% of the total population of Manghar village is engaged in bee keeping. The village has finally won almost ten government awards today. Manghar village was chosen keeping in mind that we can see the prosperity of bees in this beautiful and beautiful village.
Tourists visiting Mahabaleshwar visit this village and get to taste the pure honey collected by the people here. Collective bee keeping is done in the village, each villager has at least ten bee hives.
Mahabaleshwar
Beekeeping training is also imparted in the village for making honey and other products from bees. The collected honey is sold under the village name. In the village you can see beautiful beehive signs. Due to the pollination of bees, there is a huge increase in agricultural crop production.

For more interesting videos - SUBSCRIBE channel
देशातलं पहिल मधाचे गाव - मांघर | First Honey Village in India Manghar | Mahabaleshwar | महाबळेश्वर
=============================================
Follow me
on Instagrame -   / umakant_chavan_official  
on Facebook - https://www.facebook.com/profile.php?...

Комментарии

Информация по комментариям в разработке