संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रेरणादायी सुविचार | माऊलींचे अभंग | Sant Dnyaneshwar Suvichar Marathi

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रेरणादायी सुविचार | माऊलींचे अभंग | Sant Dnyaneshwar Suvichar Marathi

संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म : आपेगाव-पैठण) गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५

संंजीवन समाधी : रविवार दि. ०२ डिसेंबर इ.स. १२९६

संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते.
फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली
संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

Комментарии

Информация по комментариям в разработке