केळीमध्ये २८ महिन्यांमध्ये ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेणारे कपिल जाचक | जाचक पॅटर्न | बारामती IFE

Описание к видео केळीमध्ये २८ महिन्यांमध्ये ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेणारे कपिल जाचक | जाचक पॅटर्न | बारामती IFE

Follow us:
Facebook:  / indianfarmerentrepreneurs  
Instagram:   / aniketgharge23  
Mail-id: [email protected]
----------------------------------------------------------------------------------------------
कपिल जाचक.
जाचकवस्ती बारामती,पुणे.
मो.9422205661

कपिल जाचक सर हे गेल्या अठरा वर्षांपासून आपल्या शेतामध्ये केळी या पिकाची लागवड करत आहेत.आपल्या 40 एकर क्षेत्रामधील 12 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीची लागवड केली आहे.कपिल जाचक सर हे स्वतः उच्चशिक्षत आहेत. पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून ते आज उत्पादनाबाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहेत.

G9 या केळीची लागवड त्यांनी विकसित केलेल्या जोड ओळ पद्धत वापरून करत आहेत.जाचक पॅटर्न म्हणून प्रचलित असणाऱ्या या पद्धतीमध्ये एका एकरमध्ये जवळपास 1450 रोपे घेता येतात. या पद्धतीमध्ये दोन ओळींमधील अंतर साडेतीन फूट तसेच मुख्य दोन ओळींमधील अंतर 12 फूट ठेवले जाते.या पद्धतीमध्ये ते कोणत्याही प्रकारचे आंतरपिक घेत नाहीत.केळीच्या रोपांमध्ये उसाच्या पाचतीचे आच्छादन ते करतात तसेच केळीच्या फांद्यांपासून ते कंपोस्ट खत तयार करतात. केळीमध्ये ते लागण,खोडवा व निडवा हे तिन्ही पिके 28 महिन्यात घेतात.या केळी पिकांना आधारासाठी बांबूची गरज लागत नाही.केळी बांधण्यासाठी पॅकिंग पट्टीचा ते वापर करतात. पाच ते सहा महिने झाल्यानंतर लगेच ते खोडवा धरतात यामुळे 18 महिन्यातच खोडवा हार्वेस्टिंगला येतो.

केळीमध्ये यावर्षी त्यांनी लागणी मध्ये 54 टन उत्पादन घेतले आहे.तिन्ही पिकामध्ये 28 महिन्यात एकूण 110 टन उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. केळीमध्ये सर्वाधीक असा 92 किलो वजनाचा केळी घड उत्पादन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.केळीमध्ये तसेच शेतीमधील त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत बरेच ऍवार्डस मिळाले आहेत. नवीन पिढीला शेतीबद्दल आवाड निर्माण व्हावी यासाठी ते शेतावर मुलांना यांबद्दल माहिती देत असतात.महाराष्ट्रासह देशभरातील बरेचसे शेतकरी त्यांच्या फार्मवर भेट देत असतात.आज कित्येक शेतकर्यांना त्यांनी मार्गदर्शन करून सक्षम बनवले आहे.

कपिल जाचक सरांनी स्वतः तयार केलेला "जाचक पॅटर्न"चा अवलंब महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. केळीबरोबरच त्यांनी डाळिंब,ऊस या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे.तसेच एकून 14 प्रकारची फळझाडे त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहेत.त्यांच्या विहिरीमध्ये असलेले परदेशी जातीची मासे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.परिनिता या नावाने त्यांनी ऍग्रो टुरिझम आपल्या शेतामध्ये सुरू केले आहे. कपिल जाचक यांनी केळी या पिकामध्ये एक वेगळी उंची गाठली आहे.टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून शेती आपण केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल.

Комментарии

Информация по комментариям в разработке