महिलांच्या नावावर प्रॉपर्टी विकत घेण्याचे फायदे .? Benefits of buying property in the name of women?

Описание к видео महिलांच्या नावावर प्रॉपर्टी विकत घेण्याचे फायदे .? Benefits of buying property in the name of women?

महिलांच्या नावावर प्रॉपर्टी विकत घेण्याचे फायदे .? Benefits of buying property in the name of women?

होम लोनवर मिळते सूट
महिलांना घरासाठी कर्ज कमी दराने मिळते, त्या तुलनेत पुरुषांना आधी व्याज चुकवावे लागते. जसे स्टेट बँक महिलांना होम लोनवर 0.05 टक्के अर्थात 5 पॉईंटची सूट देते. तसेच इतर बँका आणि इतर वित्तीय संस्था देखील सूट देतात मात्र हा फायदा घेण्यासाठी ज्या घराची खरेदी केली जाणार आहे, ते घर महिलेचे नावावर असणे/विकत घेणे ही अट आहे.

स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट
काही राज्यात महिलेच्या नावावर असणाऱ्या संपत्तीचे रजिस्ट्रेशन करताना स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट देण्यात येते. दिल्ली सरकारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांना प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी 6 टक्के स्टॅम्प ड्यूटी तर महिलांना फक्त 4 टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते.

प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट
काही महानगरपालिका महिलांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देतात. प्रत्येक महानगरपालिका आणि भागानुसार प्रॉपर्टी टॅक्स रेट कमी-जास्त होतो. त्यामुळे महिलांच्या नावावर संपत्ती असेल तर महानगरपालिकेकडे याची चौकशी नक्की करा.
#प्रॉपर्टी_विकत_घेतांना

Комментарии

Информация по комментариям в разработке