उत्तम कांबळे (नाशिक) यांचे व्याख्यान जयभीम महोत्सव २०१९ बीड LIVE

Описание к видео उत्तम कांबळे (नाशिक) यांचे व्याख्यान जयभीम महोत्सव २०१९ बीड LIVE

उत्तम कांबळे (नाशिक) यांचे व्याख्यान जयभीम महोत्सव २०१९ बीड LIVE #a2zreport

उत्तम कांबळे हे संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम कांबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.उत्तम कांबळे यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तर, ८४ व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ८५व्या अधिवेशनात उत्तम कांबळे यांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली. कांबळे यांचे 'आई समजून घेताना' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या पुस्तकाचे ब्रेललिपीत रूपांतर झाले आहे, तसेच कानडी भाषेत आणि इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत.

~-~~-~~~-~~-~
Please watch: "वैशाली माडे यांचाभीमजयंती निमित्त बीड मधील भीमगीतं गायनाचा भव्य कार्यक्रम #a2zreport"
   • वैशाली माडे यांचाभीमजयंती निमित्त बीड...  
~-~~-~~~-~~-~

Комментарии

Информация по комментариям в разработке