मला हे दत्तगुरू दिसले -आशा भोसले -आम्ही जातो अमुच्या गावा

Описание к видео मला हे दत्तगुरू दिसले -आशा भोसले -आम्ही जातो अमुच्या गावा

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय हो‍उनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले [ Sings for Uma ]
चित्रपट - आम्ही जातो अमुच्या गावा (१९७२)
राग - तिलककमोद, देस (नादवेध

Комментарии

Информация по комментариям в разработке