Uddhav Thackeray Buldhana Speech : सत्त्ता येऊ द्या २४ तासात दाढीवाल्याला बेड्या घालून जेलात टाकतो,

Описание к видео Uddhav Thackeray Buldhana Speech : सत्त्ता येऊ द्या २४ तासात दाढीवाल्याला बेड्या घालून जेलात टाकतो,

शिवराय म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते:भाजपला केवळ मतांसाठी छत्रपती हवेत, उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यात घणाघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यात येईल. पण शिवराय हा शब्द उच्चारल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते. त्यांना ते सहनच होत नाही, असे ते म्हणालेत. भाजपला केवळ मतांसाठी शिवाजी महाराज हवे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी आहोत. पण दुसरीकडे महाराष्ट्र लुटणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. मागच्यावेळी आपल्याकडून एक चूक झाली. मी सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याविरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच चूक माझीच होती.

विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

या लोकांना गेल्यावेळी मी उमेदवारी दिली होती. त्यानंतर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होते. मी त्या चुकीसाठी तुमची माफी मागतो. पण आता मी या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. ही चूक सुधारण्यासाठी मी येथे जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. आता विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा.

उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले. हा शिवरायांचा पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावर त्यांनी दरोडा घातला. चोरी नव्हे अख्खा दरोडा घातला. 40 जणांच्या टोळीने दरोडा टाकून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचाच आहे. हे गद्दार, धोकेबाज व खोकेबाज लोक आहेत. पण आता 50 खोके नॉट ओके. त्यांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी भरपूर कमावले आहे. त्यांची घरे भरली. पण गरिबांची रिती झाली. त्यामुळे आता प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.

सुरतेतही शिवरायांचे मंदिर बांधणार

बुलढाणा म्हटले की मातृशक्तीला वंदन केलेच पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे एक चांगले मंदिर बांधणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते, त्या सुरतेतही बांधणार आहे. का नाही बांधायचे? हे केवळ घंटा वाजवण्यासाठी व केवळ पळी - पंचपात्र घेऊन बसण्यासाठी नसेल. हे मंदिर आमचे संस्कारपीठ असेल.

शिवराय म्हटले की फडणवीसांच्या अंगाची आग होते

Комментарии

Информация по комментариям в разработке