Maharashtra Times LIVE | ठाकरेंचं स्वागत, फडणवीस-दादा भेटले, अर्थ काय?

Описание к видео Maharashtra Times LIVE | ठाकरेंचं स्वागत, फडणवीस-दादा भेटले, अर्थ काय?

#UddhavThackeray #DevendraFadnavis #ShivSenaBJP #MaharashtraTimes


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर २५-३० वर्षे जुनी युती तोडून शिवसेना-भाजप वेगळे झाले. पुढे एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या रुपाने जरी हे पक्ष पुन्हा एकत्र दिसले तरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील तणाव कायमच राहिल्याचं दिसतंय. परंतु, आज (२७ जून) विद्यमान महायुती सरकारच्या अखेरच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दिसलेलं चित्र वेगळं आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं एकाच लिफ्टमध्ये असणं,चर्चा करणं, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत करणं आणि भाजप-ठाकरे गटातील एकंदरच हास्यविनोदात सुरु संवादामुळे आगामी विधानसभेच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष पुन्हा दुश्मनीकडून दोस्तीकडे वळतायत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке