‘शिवसमर्थ’ च्या राजाचे जल्लोषात स्वागत

Описание к видео ‘शिवसमर्थ’ च्या राजाचे जल्लोषात स्वागत

तळमावले (ता.पाटण) येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.ऑप.क्रे.सोसा.लि; तळमावले आणि परिवाराच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसमर्थ भवन मध्ये शिवसमर्थ च्या राजाची प्रतिष्टापना करण्यात येते. गेले अनेक वर्षापासून संस्थेमध्ये पारंपारिक आणि पर्यावरणपुरक पध्दतीने गणेषोत्सव साजरा केला जातो. यंदा मलकापूर कराड येथील अश्टगंध ढोल ताशा पथकाच्यावीतने शिवसमर्थच्या राजाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिबेवाडी येथून शिवसमर्थ राजाच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला. नैसर्गिक फुलांनी सजवलेल्या पालखीत गणरायाची ठेवून तिची मिरवणूक काढण्यात आली.
गुलालविरहीत, पारंपारीक वाद्याचा वापर करुन काढलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. यासोबतच टाळ-मृदुंगाच्या ठेक्यात आणि रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात ही मिरवणूक निघाली होती. पाटण तालुका वारकरी संघटनेचे ढेबेवाडी विभाग प्रमुख ह.भ.प.शिद्रुक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे वारकरी या मिरवणूकीत सहभागी झाले होते. शिवसमर्थमधील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी या मिरवणूकीत सहभागी होवून आंनद घेतला. तळमावले परिसरात या आगळयावेगळया मिरवणूकीचे कौतुक करण्यात आले.
शिबेवाडी कुंभारगांव येथील सुप्रसिध्द मुर्तीकार प्रकाश कुंभार यांनी ही शाडूची 21 इंची लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची केली आहे. या मुर्तीचे काम अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईने केलेेले दिसून येते.

‘श्रीं’ची दररोजची आरास नैसर्गिक फुले वापरुन करण्यात येत होती. शास्त्रीय पध्दतीने पुजा पाठ, धार्मिक विधी करण्यात येत होती. गणेश उत्सवादरम्यान शिवसमर्थमधील वातावरण भक्तीमय झाले होेते. दररोज अनेक नागरिक भक्तगण गणरायाचे दर्षन घेण्यासाठी येत होते.
आदर्शवत मिरवणूक, पुजाअर्चा, सत्यनारायण महापुजा, सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम राबवून संस्थेने लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव गेली काही वर्षापासून साजरा करत आहेत.
एक आदर्षवत गणेषोत्सव शिवसमर्थ परिवाराच्यावतीने साजरा करण्यात येतो. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ परिवारातील सर्व सदस्यांनी विषेश परिश्रम घेत आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке