टोमॅटो करपा नियंत्रण | Top 3 Fungicides | Early Blight | Late Blight Control

Описание к видео टोमॅटो करपा नियंत्रण | Top 3 Fungicides | Early Blight | Late Blight Control

टोमॅटो करपा नियंत्रण | Top 3 Fungicides | Early Blight | Late Blight Control #tomato #blight

1. लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) -
अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो.
सुरवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान
गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे
वलयांकित ठिपके. प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात
मिसळून मोआकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार
होतात. यामुळे पाने करपून गळतात. पानाप्रमाणे
खोडावरदेखील गर्द तपकिरी वलयांकित डाग
पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात.
2. उशिरा येणारा करपा (लेट ब्लाइट) -
फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या बुरशीमुळे पाने,
खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून
येतो. सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट
तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.
ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड,
पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात. अती
आर्द्र हवामानात पानाच्या पृष्ठभागावर आणि
ठिपक्याच्या कडेवर पांढरी बुरशीची वाढ होते.
दोन्ही करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे
होतात. तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी
व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке