कैवल्याच्या चांदण्याला भुकेला|Kaivalyachya Chandnyala|पं.शौनक अभिषेकी,विदुषी मंजुषा पाटील|अभंगरंग

Описание к видео कैवल्याच्या चांदण्याला भुकेला|Kaivalyachya Chandnyala|पं.शौनक अभिषेकी,विदुषी मंजुषा पाटील|अभंगरंग

#अभंगरंग #पद्मश्रीपद्मजाफेणाणीजोगळेकर #musicvideo's #marathisong #songs #kolhapur #आशाभोसले #पंशौनकअभिषेकी #विदूषीमंजुषापाटील #अभंग #varkari
#jayshreeram #sangli #latamangeshkar #pjitendraabhisheki

Hi ,
wel come to my you tube channel,
we come with something new.

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

चराचरा पार न्या हो जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर

गीत-अशोक जी परांजपे
संगीत-पं .जितेंद्र अभिषेकी
स्वर-पं .जितेंद्र अभिषेकी
नाटक-संत गोरा कुंभार
राग-भैरवी
गीत प्रकार- शब्द शारदेचे चांदणे,नाट्यसंगीत ,प्रार्थना विठ्ठल विठ्ठल

"शौनक अभिषेकी " हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि संगीतकार आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे शौनक हे पुत्र आहेत. लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत. शौनक अभिषेकी म्हणतात, "संगीतातल्या साक्षात सरस्वती म्हणजे लतादिदी. जन्मोजन्मी रीयाज केल्यावर जो सूर मिळतो तो दिदींना नैसर्गिकरीत्या मिळालाय. आम्ही प्रचंड रियाज आणि साधना करून जे मिळवायचा प्रयत्‍न करतो ती देणगी दिदींच्या ठायी निसर्गदत्तच आहे. साधना करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या सुरांमधल्या भावांचा अभ्यास करावा.

"विदूषी मंजुषा कुलकर्णी-पाटील " {हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका }
यांचा जन्म सांगली , महाराष्ट्र , भारत येथे २ नोव्हेंबर १९७१ रोजी संगीतकारांच्या कुटुंबात झाला. चिंटूबुवा म्हैसकर यांच्याकडून वयाच्या बाराव्या वर्षी शिकायला सुरुवात केली.
या हिंदुस्थानी संगीताच्या ख्याल प्रकारासाठी ओळखल्या जातात . ठुमरी, भजन आणि नाट्य-संगीत इत्यादी अर्ध शास्त्रीय संगीत प्रकारांमध्येही ती उत्कृष्ट आहे.
मंजुषाने एमए (संगीत) परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज द्वारे प्रदान केलेली संगीत विशारद पदवी देखील प्राप्त केली. ऑल इंडिया रेडिओवरील शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय संगीतासाठी ती 'ए' श्रेणीची कलाकार आहे.
अशा या खास दिग्गजांची मा . ना . सुरेशभाऊ खाडे मिरज आयोजित अभंग कार्यक्रमाची मैफिलीची ही झलक खास तुमच्यासाठी...
अभंगरंग कार्यक्रम मिरज
ध्वनीचित्रमुद्रण : प्रदीप सुतार, सांगली.
Graphic design by
Indrajeet sutar
social media
Mangesh pujari
please do like share and subscribe our channel and support us
thank you

Комментарии

Информация по комментариям в разработке