काळ आला जीव गेला देह राहिला | दुःखद प्रसंगा वरील भजन | अवश्य ऐका |

Описание к видео काळ आला जीव गेला देह राहिला | दुःखद प्रसंगा वरील भजन | अवश्य ऐका |

काळ आला जीव गेला देह राहिला
सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला ||धृ||
जन्मभरी संसारी तू जे कर्म केले
एका हाताने केले दुसऱ्याने भरले
देह मृत्युमुखी सदैव हा राहिला || १||
जोवरी जीवन तोवरी वेडी सारी माया
आत्मा निघून गेल्यावर बुडाली ही दुनिया
भार दुःखाचा सदैव हा वाहिला ||२||
बायका मुले जिवलगाने आक्रोश केला
घडीचा तमाशा नंतर विसर हा पडला
सारा खजिना हा जाग्यावरी राहिला ||३||

Комментарии

Информация по комментариям в разработке