Wagh Baras | वाघ बारस | Tribal Diwali Festival | आदिवासी संस्कृती | Thane

Описание к видео Wagh Baras | वाघ बारस | Tribal Diwali Festival | आदिवासी संस्कृती | Thane

नमस्कार मंडळी तुमचा स्वागत आहे आपल्या ‪@SameerDagaleVlog या यूट्यूब चैनल वरती ❤️ तुम्हाला जर माझे Vlog आवडत असतील तर व्हिडिओला Like, share, comment आणि चॅनेलला subscribe करायला विसरू नका .


वाघ बारस माहिती : -

आदीवासी संस्कृतीत वाघबारस या सणास अन्यनसाधारण महत्व आहे.
आदिवासी समाज हा निसर्गपुजक असुन निसर्गाशी कायम एकनिष्ठ संबंध ठेवुन असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे

वाघबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो
वाघबारशीच्या दोन तीन दिवस आधी लहान मोठ्या मुलांकडुन गावात काही घरोघरी फिरुन वाघ्याची गाणी गाऊन शिधा गोळा केला जातो.

वाघ्याचे गाणं
वाघ्या रं वाघ्या
वाघ्याच्या गाई
गेल्या राई
आमचा वाघ्या
दुध भात खाई
वाघ्या घुरंरररर🐯 🐅

हा शिधा व इतर आवश्यक साहित्य घेवुन आदीवासी बांधव गाई गुरांसोबत रानात जाऊन जंगलाच्या राजाला वर्षेभर आमच्या गाई गुरांना त्रास देवू नये म्हणून खीरीचा किंवा इतर गोड जेवणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेवणाचा नैवेद्य घेवुन नदिच्या/झऱ्याच्या कडेला दगडावर शेंदरांने वाघाची प्रतिकृती काढुन त्यालाच वाघ्या 🐯 🐅 मानुन त्याला नैवेद्य दिला जातो व नारळ फोडला जातो... वाघ्याला नैवेद्य जात नाही तो पर्यंत इतरांनी ही जेवणास सुरुवात करायची नाही हा दंडक फार पुर्वीपासुन आजतागायत सुरु आहे.

वाघबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्याने त्या दिवसापासून पुढील पाच दिवस गावातील मारुती मंदीरातील दिव्यासाठी तेल मागितले जाते... लहान मुले पणती घेवून गावात प्रत्येक घरोघरी तेल मागितले जाते, तेल मागताना दिवाळीची सुरेख गाणी लयबद्ध चालीत म्हटली जातात... पणती भरली की एका बाटलीत तेल साठविले जाते... हे तेल मग मारुती मंदिरात दिवा लावण्यास वापरण्यात येते.
तेल मागण्यासाठी काहीजण लव्हाळयाच्या दिवट्याही पणती ठेवण्यासाठी तयार करून ठेवतात.. या दिवट्यांना नागाच्या फणी सारखा आकार दिलेला असतो व त्या फणीखाली पणती ठेवण्यासाठी जागा केलेली असते... प्रथम पाहणाऱ्यांच्या मनात नक्कीच ती कलाकुसर उतरल्यावाचुन राहत नाही.

वाघबारशी पासुन चार दिवस तेल मागितले जाते व शेवटच्या दिवशी शिधा(भात, तांदुळ, गहु.. ) मागितला जातो... त्या जमा झालेल्या शिध्याची मग गावातील दुकानात विक्री करुन आलेल्या पैशातुन सर्व मुलांना फटाके घेतले जातात त्या फटाक्यांचे वाटप करुन मारुती मंदीरा समोर सामुहिक रीत्या फटाके फोडण्याचा आनंद घेतला जातो.

आदिवासी समाजात वाघबारस साजरी केली जाते तर वैदिक संस्कृतीत वसुबारस साजरी केली जाते आता हळुहळु वैदिक संस्कृतीचे अतिक्रमण आदिवासी संस्कृतिवर ही होत आहे... त्यामुळे संस्कृति संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे नाहीतर पुढील पिढीस जात पडताळणी करताना मुलाखतीत सण, देव व कुळसाय या गोष्टी आठवणारही नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке